Join us
Daily Top 2Weekly Top 5

विरोध झालेल्या भागातूनच आता शक्तिपीठ महामार्गाची पुन्हा मागणी; भूसंपादन मोबदला वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 14:04 IST

shaktipeeth mahamarg bhusampadan शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित मार्गाचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या महामार्गाची लांबी आधी ८०२ किमी एवढी होती. मात्र, आता मार्गात बदल केल्याने त्याची लांबी ५४ किमीने वाढून ८५६ किमीपर्यंत गेली आहे.

मुंबई : शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित मार्गाचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या महामार्गाची लांबी आधी ८०२ किमी एवढी होती. मात्र, आता मार्गात बदल केल्याने त्याची लांबी ५४ किमीने वाढून ८५६ किमीपर्यंत गेली आहे.

सुधारित मार्गात सातारा जिल्ह्यासह चंदगड परिसराचा समावेश केला आहे. मात्र, त्यानंतर या महामार्गाला आधी विरोध केला होता.

आता विरोध करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा निवेदने देऊन महामार्ग आमच्या भागातून न्या अशी मागणी केली आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

नागपूरची थेट गोवा राज्याशी जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या शक्तिपीठ महामार्गाबाबत गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली. चंदगड हा भाग महाबळेश्वरप्रमाणे थंड प्रदेश आहे. त्यातून या भागात पर्यटनाला आता मोठी चालना मिळेल.

यापूर्वी सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागांत लोकांचा महामार्गाला विरोध होता. त्यामुळे त्या भागातील मार्ग बदलण्यात आला, असेही गायकवाड यांनी म्हटले.

भूसंपादनाची अधिसूचना लवकरच
◼️ नांदेडमध्ये विरोधामुळे जवळपास १०० किमी लांबीचा मार्ग बदलण्यात आला आहे.
◼️ शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित मार्गाची अधिसूचना निघाली आहे. भूसंपादनासाठी १२/२ ची अधिसूचना लवकरच निघेल.
◼️ त्यानंतर बदललेल्या मार्गातील गावांची संयुक्त मोजणी सुरू होईल.
◼️ या भागातील भूसंपादनासाठी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला दिला जाईल.
◼️ त्यामुळे भूसंपादन मोबदल्यातही वाढ होण्याची शक्यता आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

अधिक वाचा: Monsoon Alert : मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात किती तारखेला प्रवेश करणार?

English
हिंदी सारांश
Web Title : Shaktipeeth Highway: Demand resurfaces from areas that initially opposed it.

Web Summary : The Shaktipeeth Highway's revised plan includes previously opposed areas. Length increased to 856 km. Farmers now request inclusion. Land acquisition compensation may increase, mirroring Samruddhi Mahamarg terms. Notification soon.
टॅग्स :शक्तिपीठ महामार्गकोल्हापूरशेतकरीशेतीराज्य सरकारसरकारमहामार्गसमृद्धी महामार्गसांगलीसोलापूरराज्य रस्ते विकास महामंडळनांदेड