lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > आता डोळे स्कॅन करून मिळणार रेशन; स्वस्त धान्य दुकानात 'आय स्कॅनर'

आता डोळे स्कॅन करून मिळणार रेशन; स्वस्त धान्य दुकानात 'आय स्कॅनर'

Now the ration will be obtained by scanning the eyes; 'Eye Scanner' in Cheap Grain Stores | आता डोळे स्कॅन करून मिळणार रेशन; स्वस्त धान्य दुकानात 'आय स्कॅनर'

आता डोळे स्कॅन करून मिळणार रेशन; स्वस्त धान्य दुकानात 'आय स्कॅनर'

एका वर्षाच्या प्रतीक्षेनंतर लागला मुहूर्त

एका वर्षाच्या प्रतीक्षेनंतर लागला मुहूर्त

शेअर :

Join us
Join usNext

रेशन दुकानातून धान्य घेताना बोटांचे ठसे ई-पॉस मशीनवर येत नाहीत म्हणून रेशन धान्य दुकानातून रिकाम्या हातांनी लाभार्थीना परत जावे लागते. मात्र आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात 'आय स्कॅनर गन' असणार आहे. २ जी ऐवजी आता मिळणार ४ जी ई पॉस मशीन रेशन दुकानात येणार आहे.

एक वर्षापूर्वी जालना जिल्हा पुरवठा विभागाकडून आधुनिक यंत्रसामग्रीची मागणी करण्यात आली होती. येत्या सोमवारपर्यंत ही यंत्रे पुरवठा विभागाच्या ताब्यात येणार आहेत. यानंतर जालना जिल्ह्यातील १२८० स्वस्त धान्य दुकानांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंबड तालुक्यातील १९५ दुकानांसह जिल्ह्यातील १२८० दुकानांमध्ये नवीन ई-पॉस मशीन व आय स्कॅनर गन दिली जाणार आहे.

रेशन धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी शासनाने ई-पॉस यंत्रणा कार्यान्वित केली. यामध्ये व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांना धान्य दिले जाते. जिल्ह्यातील सर्वच रास्तभाव दुकानात ई-पॉस यंत्र आहे. मात्र, काही जणांच्या बोटांवरील रेषा पुसट होतात. विशेषतः गवंडी काम करणाऱ्या व्यक्ती, धुणीभांडी करणाऱ्या महिला यांना ही समस्या जाणवते.

अशा लाभार्थीना कुटुंबातील अन्य व्यक्तींना आणून त्यांचे ठेस देऊन धान्य घ्यावे लागते. यामुळे आता आधुनिक पद्धतीचे 'आय स्कॅनर गन' दिले जाणार आहेत. ज्या व्यक्तीच्या हाताचे ठसे ई-पॉस यंत्रावर येणार नाहीत. त्यांचे डोळे स्कॅन करून त्यांना धान्य देण्यात येणार आहे.

वाटप सुरू करू जिल्ह्यातील १२८० स्वस्त धान्य दुकानांसाठी आय स्कॅनर व ४ जी ई-पॉस यंत्राची मागणी केलेली होती. इतर जिल्ह्यात यंत्रांचे वाटप झालेले आहे. येत्या सोमवारपर्यंत आधुनिक यंत्रसामग्री पुरवठा विभागाकडे येईल. - सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी

तीन वर्षापासून नवीन अद्यावत मशीन मिळाव्यात ही मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटना करत आहे. नवीन यंत्र आल्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त ग्राहकांना धान्य देणे सुलभ होईल. नवीन मशीनमधील आय स्कॅनर तंत्रज्ञानामुळे ज्या कार्डधारकाचे बोटांचे ठसे येत नाही त्यांना लाभ देणे आता सोय होणार आहे. - संभाजी कळकटे, तालुकाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना

हेही वाचा - ऊसाच्या चार मित्रांनी बनविले विविध प्रॉडक्ट; आता स्टार्टअप करून उभारला ब्रॅंड  

Web Title: Now the ration will be obtained by scanning the eyes; 'Eye Scanner' in Cheap Grain Stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.