lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊसाच्या उत्पादनाचा ब्रॅंड

चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊसाच्या उत्पादनाचा ब्रॅंड

A natural sugarcane product brand founded by four friends | चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊसाच्या उत्पादनाचा ब्रॅंड

चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊसाच्या उत्पादनाचा ब्रॅंड

नैसर्गिक शेती ते त्यातून पिकविलेल्या पिकांचे मूल्यवर्धन करत त्यातून निर्माण झालेला चार मित्रांचा अनोखा ब्रॅंड.

नैसर्गिक शेती ते त्यातून पिकविलेल्या पिकांचे मूल्यवर्धन करत त्यातून निर्माण झालेला चार मित्रांचा अनोखा ब्रॅंड.

शेअर :

Join us
Join usNext

रविंद्र शिऊरकर 

पारंपरिक व्यवसायातून वेगळा मार्ग शोधत आधुनिकतेच्या वाटेवर चालत चार मित्रांच्या एकत्रित समूहाने उभा केला नैसर्गिक प्रक्रियेतून तयार होणाऱ्या विविध खाद्य पदार्थांचा फार्म टु प्लेट ब्रँड. 

छ्त्रपती संभाजीनगर - जालना महामार्गावरील सटाणा ता. जि. छ्त्रपती संभाजीनगर येथील नंदकिशोर घावटे यांना दीड एकर रस्त्यालगत शेती.
पारंपरिक कपाशी, तुर, मका, अशी पिके ते घेत. मित्रांसोबत हुरडा पार्टी ला एकदा गेल्यावर आपण हि हे सुरु करावं अशी संकल्पना नंदकिशोर यांनी मित्र संजय केदारे, दिगंबर लाटे, आर आर घावटे यांना मांडली.  

नंदकिशोर यांनी मोफत जागा देत तयारी दाखवल्याने इतर मित्रांनी देखील साथ दिली आणि यातून एक उत्तम आर्थिक फायद्याचा हुरडा पार्टीचा हंगाम या चार मित्रांच्या मांदियाळी ला गेल्या वर्षी लाभला.

हुरडा हंगाम चांगला गेला मात्र आता पुढे काय करायचं या विवंचनात असणार्‍या या मित्रांना रसवंतीची कल्पना सुचली. तसेच सोशल मीडियातुन एका विविध खाद्य पदार्थांच्या प्रशिक्षण संस्थेची माहिती मिळाली. तिथून प्रशिक्षण घेऊन आता जानेवारी पासून हि मित्र मंडळी परिसरातील नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकर्‍यांकडून ६ ते ७ रुपये किलो प्रमाणे पोहचं ऊस खरेदी करतात. त्यांचे विविध पदार्थात मूल्यवर्धन करून विक्री करतात.

ज्यात स्वतः च्या रसवंतीला गरजेनुसार या ऊसापासुन निर्मित झालेला रस विक्री केला जातो. इतर पुढे काही  विविध खाद्य पदार्थ या ऊसाच्या रसापासून तयार करून त्यांची विक्री होते. आणि यातून सध्या हि मंडळी चांगला आर्थिक नफा मिळवत आहे. सोबत शेतकऱ्यांच्या पारंपरिक पिकांचे यातून अधिकाधिक मूल्यवर्धन होत आहे. 

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक : मात्र आता करतोय पेरु शेती !

गन्ना चुस्की (कुल्फी) 

फार्म टू प्लेट चे मुख्य आकर्षण असलेली ऊसाचा रस आणि गीर गाईचे शुद्ध देशी दूध यांचे मिश्रण करून तयार होणारी गन्ना चुस्की. या गन्ना चुस्कीला बाजारात १५ ते २० रुपयांना सहज खरेदी केली जाते. एकावेळेत पूर्ण रस काढणाऱ्या आधुनिक ऊस रस मशीन, दूध, शीतकरण यंत्र (फ्रिज), आणि कुल्फीचे साचे यातून एक व्यक्ती दिवसाकाठी २५० ते ३०० कुल्फी तयार शकतो. 
एका कुल्फी मागे सरासरी साठ टक्के आर्थिक फायदा देणारी हि कुल्फी चवीला देखील सर्वोत्तम आहे आणि शिवाय भेसळ मुक्त.

फार्म टू प्लेटचे इतर विविध पदार्थ 
गन्ना हर्बल चहा (विना साखर, विना चहा पत्ती फक्त ऊसाचा रस आणि काही मसाले युक्त), गन्ना फ्रोजन ज्यूस, गन्ना पेढा (ऊसाच्या रसापासून निर्मित पेढा), गन्ना इमली चटणी(चिंच, चौदा मसाले व ऊसाचा रस).

विक्री व्यवस्थापन व उत्पन्न 
सध्या काही ठराविक दुकानांतून कुल्फी ची दिवसाकाठी सरासरी ५०० नगांची विक्री होते. तर मागणीनुसार इतर पदार्थांची विक्री केली जाते. जागा भाडे अध्याप हि नसल्याने सध्या इतर खर्च वजा जाता यातून या मित्रांना नोकरी पेक्षा उत्तम रोजगार यातून सध्या मिळत असून यात आणखी काही नवनवीन संकल्पना जोडणार असल्याचे नंदकिशोर सांगतात.

Web Title: A natural sugarcane product brand founded by four friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.