Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप

आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप

Now get complete information about village administration with just one click from home; 'Meri Panchayat' app | आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप

आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप

Meri Panchayat App : डिजिटल युगात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने 'मेरी पंचायत' ॲप आणले आहे. या माध्यमातून ग्रामस्थांना आता आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा सुरू आहे, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

Meri Panchayat App : डिजिटल युगात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने 'मेरी पंचायत' ॲप आणले आहे. या माध्यमातून ग्रामस्थांना आता आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा सुरू आहे, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

डिजिटल युगात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने 'मेरी पंचायत' ॲप आणले आहे. या माध्यमातून ग्रामस्थांना आता आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा सुरू आहे, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

केंद्र तसेच राज्य शासनाकडून ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे. विकासात येणारे अडथळे दूर व्हावेत, यासाठी थेट ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जात आहे.

ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता असावी व आपल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत काय विकास सुरू आहे, कोणत्या योजना आल्या आहेत, शासनाकडून किती निधी मिळाला, आदी माहिती सहजरीत्या उपलब्ध होणार आहे. त्यासाठीच केंद्र शासनाने 'मेरी पंचायत' हे ॲप आणले आहे.

ग्रामस्थांना अभिप्राय नोंदवता येणार

स्थानिक पातळीवरील एखाद्या विकासकामाची सूचना फोटोसह सूचित करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ शकता. तसेच काही समस्यांचे फोटो अपलोड करून झालेल्या कामातील चुका किंवा त्या कामाचे कौतुक समोर आणता येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबाबत ग्रामस्थांना आपला अभिप्राय नोंदवता येणार आहे.

ॲपवर काय माहिती मिळणार

• 'मेरी पंचायत' ॲपच्या माध्यमातून ग्रामस्थांना ग्रामपंचायत सदस्य किती याची माहिती मिळेल.

• एकूण किती समित्या स्थापन केल्या असून, त्यांचे अध्यक्ष कोण आहेत.

• नोटीस बोर्डाच्या माध्यमातून ग्रामस्थांना काय सूचना दिल्या आहेत.

• ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान कोणत्या प्रकारचे आहे.

• कोणत्या योजनेतून विकासकामे सुरू आहेत.

• ग्रामपंचायतीची एकूण बैंक खाती किती आहेत.

• कोणत्या कामासाठी किती रक्कम खर्च केली.

• गावात पाण्याचे स्रोत व नळ कनेक्शन किती आहेत.

आर्थिक लेखाजोखा समोर येणार

'मेरी पंचायत' ॲपच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा आर्थिक बाबींचा संपूर्ण लेखाजोखा ग्रामस्थांसमोर येणार आहे. त्यामुळे आपल्या गावाशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन वेळ घालवावा लागणार नाही.

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध; सौर कृषिपंपांच्या समस्यांसाठी आता फोनद्वारे किंवा ऑनलाइन तक्रार करता येणार

Web Title: Now get complete information about village administration with just one click from home; 'Meri Panchayat' app