Lokmat Agro >शेतशिवार > Namo Kisan Hapta : नमो किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

Namo Kisan Hapta : नमो किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

Namo Kisan Hapta : When will the next installment of Namo Kisan Yojana be available? Read in detail | Namo Kisan Hapta : नमो किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

Namo Kisan Hapta : नमो किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पी.एम. किसान योजनेच्या पात्र लाभार्थींना वार्षिक रु. ६०००/- तीन समान हप्त्यांमध्ये लाभ देण्यासाठी राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (NSMNY) राज्यात सुरु केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक तीन समान हप्त्यात एकुण रक्कम रु. ६०००/- प्रती वर्षी लाभ देय आहे.

राज्यात दिनांक ०९ मे, २०२५ अखेर एकुण १२३.७८ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी एकुण ११८.५९ लाख शेतकऱ्यांना (१ ते १९ हप्ते) एकूण रू. ३५,५८६.२५ कोटी लाभ मिळालेला आहे.

तसेच पी.एम.किसान योजनेचा माहे एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीतील २० वा हप्त्याचे वितरण केंद्र शासनाने बंधनकारक केलेल्या तिन्ही बाबींची पूर्तता केलेल्या लाभार्थ्यांना माहे जून, २०२५ मध्ये अदा करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पी.एम. किसान योजनेच्या पात्र लाभार्थींना वार्षिक रु. ६०००/- तीन समान हप्त्यांमध्ये लाभ देण्यासाठी राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (NSMNY) राज्यात सुरु केली आहे.

दिनांक ०९ मे, २०२५ अखेर एकुण ९३.०९ लाख शेतकऱ्यांना (१ ते ६ हप्ते) एकूण रू. ११,१३०.४५ कोटी लाभ अदा केलेला आहे.

तसेच माहे एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीत पी.एम.किसान योजनेच्या २० व्या हप्त्याचा लाभ अदा होणाऱ्या लाभार्थींना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ७ वा हप्ता अदा करण्यात येणार आहे.

अधिक वाचा: सोयाबीन पेरणीसाठी बियाणे निवडताना उगवण क्षमता तपासणी का करावी? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Namo Kisan Hapta : When will the next installment of Namo Kisan Yojana be available? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.