Join us

Mutkhada : उन्हाळ्यात किडनी स्टोन मुतखड्याचा धोका का वाढतो? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 14:04 IST

उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे लघवीत खनिजे आणि क्षार जमा होतात. यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पिले नाही तर किडनी स्टोन (मुतखडा) होण्याची शक्यता वाढते.

उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे लघवीत खनिजे आणि क्षार जमा होतात. यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पिले नाही तर किडनी स्टोन (मुतखडा) होण्याची शक्यता वाढते.

शेतकरी तसेच शेतकरी महिला शेतात काम करत असतात अशा परिस्थितीत उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे, जेणेकरून किडनी स्टोनचा धोका कमी करता येईल, असा सल्ला डॉक्टर देतात.

उन्हाळ्यात घाम जास्त येतो, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. यामुळे वारंवार घसा कोरडा होतो. त्यावेळी शरीराला पाण्याची गरज असते. कमी पाण्यामुळे लघवीत खनिजे आणि क्षार जमा होतात. ते किडनी स्टोन तयार करण्यास मदत करतात.

सातत्याने शरीरातील पाणी कमी झाले तर उन्हाळ्यात मुतखडा होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. ज्यामुळे मुतखडा होण्याचा धोका टाळता येईल.

किडनी स्टोन कसा वाढतो?◼️ किडनी स्टोनचे मुख्य कारण म्हणजे कमी प्रमाणात घट्ट लघवी आहे.◼️ उष्ण तापमानात घाम येणे, जास्त व्यायाम करणे किंवा पुरेशा द्रवपदार्थाचे सेवन न करणे यामुळे शरीरात द्रवपदार्थाची कमतरता होते.◼️ लघवीमध्ये असलेले क्षार विरघळण्यासाठी पुरेसे द्रव नसल्यास लघवी घट्ट होते.◼️ खनिजे आणि क्षारांची पातळी वाढते तेव्हा हे स्फटिक एकत्र होऊन लघवीला दगडांचे रूप येते.◼️ कधी कधी हा स्टोन मूत्रवाहिनीपर्यंत पोहोचतो.◼️ मूत्र वाहिनीमध्ये स्टोन जमा झाल्यास तो लघवीचा प्रवाह रोखतो, त्यामुळे तीव्र वेदना होतात.

काय काळजी घ्याल?किडनी स्टोन टाळण्यासाठी पाणी भरपूर प्यावे, आहारात जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि ऑक्सलेट असलेले पदार्थ टाळावे, अल्कोहोलचे सेवन करू नये अशी काळजी घ्यावी लागते.

उन्हाळ्यात अधिक पाणी पिण्याची गरजउन्हाळ्यात कमीत कमी प्रत्येकाने तीन ते चार लिटर पाणी प्यावे. कष्टाची कामे करणारे आणि उन्हात असणाऱ्यांनी यापेक्षा अधिक पाणी प्यावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अधिक वाचा: वाडा तालुक्यातील औषधी गुणधर्म असलेल्या प्रसिद्ध देशी पांढऱ्या कांद्याची बाजारात एंट्री

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सपाणीतापमानहवामान अंदाजडॉक्टरशेतकरीमहिला