Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > अबब 'या' गावातील शेतकऱ्यांची तब्बल २५० पेक्षा अधिक मुले शासकीय सेवेत; अधिकाऱ्यांचे गाव म्हणून निर्माण झाली ओळख

अबब 'या' गावातील शेतकऱ्यांची तब्बल २५० पेक्षा अधिक मुले शासकीय सेवेत; अधिकाऱ्यांचे गाव म्हणून निर्माण झाली ओळख

More than 250 children of farmers from Abab 'ya' village are in government service; It has become known as a village of officials | अबब 'या' गावातील शेतकऱ्यांची तब्बल २५० पेक्षा अधिक मुले शासकीय सेवेत; अधिकाऱ्यांचे गाव म्हणून निर्माण झाली ओळख

अबब 'या' गावातील शेतकऱ्यांची तब्बल २५० पेक्षा अधिक मुले शासकीय सेवेत; अधिकाऱ्यांचे गाव म्हणून निर्माण झाली ओळख

सेलू शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या रवळगाव येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी शैक्षणिकदृष्ट्या प्रगती करत प्रशासनातील अनेक पदाला गवसणी घातली आहे. रवळगावने अधिकाऱ्यांचे गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

सेलू शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या रवळगाव येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी शैक्षणिकदृष्ट्या प्रगती करत प्रशासनातील अनेक पदाला गवसणी घातली आहे. रवळगावने अधिकाऱ्यांचे गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

मोहन बोराडे 

परभणी जिल्ह्याच्या सेलू शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या रवळगाव येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी शैक्षणिकदृष्ट्या प्रगती करत प्रशासनातील अनेक पदाला गवसणी घातली आहे. रवळगावने अधिकाऱ्यांचे गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

विशेष म्हणजे, ही सर्व मुले जमीनदारांपासून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुले आहेत. या गावातील वर्ग एकचे दहा अधिकारी आहेत. तर वर्ग दोनचे बारा अधिकारी असून, ३० डॉक्टर आहेत.

शासकीय नोकरदार तब्बल २०० आहेत. प्रत्येक क्षेत्रात रवळगावच्या भूमिपुत्रांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून सेलू शहराची ओळख आहे. शहरापासून ४ किमी अंतरावर ५ हजार लोकसंख्येचे रवळगाव हे छोटेसे खेडे आहे.

सन १९७० रामराव रोडगे च्या आसपास (विभागप्रमुख, कृषी विद्यापीठ, परभणी) व कै. गोपीनाथराव रोडगे (शिक्षणाधिकारी) हे या गावाचे पहिले अधिकारी होते. त्यानंतर शिक्षणाचा वारसा पुढे चालू राहिला.

गावापासून सेलू तालुक्याचे अंतर ४ किमी असले तरी रस्त्याची सुविधा नव्हती. अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा खळगाव येथे शिक्षण घेतले. सातवीनंतर पुढील शिक्षणासाठी सेलू येथे पायी किंवा सायकलीवर जावे लागत असे. सर्व विद्यार्थी शेतकऱ्यांची मुले असल्यामुळे परिस्थिती जेमतेमच होती.

आज रवळगावमध्ये ३० डॉक्टर, १३ इंजिनिअर, ५ वकील, ३ सीए, ३० शिक्षक आणि प्राध्यापक, ३ विक्रीकर निरीक्षक, ३ मंत्रालयीन सहायक अधिकारी तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पास होऊन उपजिल्हाधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी, वन अधिकारी, पोलिस निरीक्षक, विक्री कर निरीक्षक अशा विविध विभागांत रवळगावच्या सुपुत्रांची निवड झालेली आहे.

कॅनडा, फ्रान्स, जर्मनीत उच्च शिक्षण

• खळगावातील मुलं एवढ्यावरच थांबली नाहीत. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी येथे उच्च शिक्षण घेऊन परत आपल्या मायदेशी नोकरी करत आहेत.

• तसेच सध्या जर्मनी येथे मुले व रवळगावच्या सुनादेखील इंजिनिअर म्हणून उच्च पदावर काम करीत आहेत.

• ही खळगावसाठी अभिमानाची बाब आहे. याचा पुरेपूर उपयोग रवळगाव येथील विद्यार्थी घेत आहेत.

हेही वाचा : लिहा येथील शेतकऱ्याची कन्या जिद्द अन् जिकाटीच्या जोरावर बनली न्यायाधीश; आरती सोनुणे यांचा संघर्षमय प्रवास

Web Title : रवलगाँव: महाराष्ट्र का गाँव जहाँ 250 से अधिक निवासी सरकारी नौकरी में।

Web Summary : परभणी के पास रवलगाँव 'अधिकारियों का गाँव' के रूप में जाना जाता है क्योंकि कई निवासियों ने सरकारी पद हासिल किए हैं। कभी बुनियादी सड़क पहुंच की कमी थी, अब विभिन्न विभागों में डॉक्टर, इंजीनियर और अधिकारी हैं, कुछ विदेश में उच्च शिक्षा प्राप्त कर रहे हैं।

Web Title : Ravalgaon: Maharashtra village boasts over 250 residents in government jobs.

Web Summary : Ravalgaon, near Parbhani, is known as 'officers' village' because many residents secured government positions. Once lacking basic road access, now boasts doctors, engineers, and officers in various departments, with some pursuing higher education abroad.