Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > 'व्हॅलेंटाइन्स डे'साठी मावळच्या गुलाबाची क्रेझ; यंदा तब्बल ५० ते ५५ लाख फुलांची निर्यात होणार

'व्हॅलेंटाइन्स डे'साठी मावळच्या गुलाबाची क्रेझ; यंदा तब्बल ५० ते ५५ लाख फुलांची निर्यात होणार

Maval rose craze for Valentine's Day; 50 to 55 lakh flowers to be exported this year | 'व्हॅलेंटाइन्स डे'साठी मावळच्या गुलाबाची क्रेझ; यंदा तब्बल ५० ते ५५ लाख फुलांची निर्यात होणार

'व्हॅलेंटाइन्स डे'साठी मावळच्या गुलाबाची क्रेझ; यंदा तब्बल ५० ते ५५ लाख फुलांची निर्यात होणार

'व्हॅलेंटाइन्स डे' जवळ येत असतानाच, मावळातील गुलाबाला मागणी वाढली आहे. येथील पॉलीहाऊसमध्ये जानेवारीपासूनच गुलाबाच्या काढणीची आणि पॅकिंगची लगबग सुरू आहे.

'व्हॅलेंटाइन्स डे' जवळ येत असतानाच, मावळातील गुलाबाला मागणी वाढली आहे. येथील पॉलीहाऊसमध्ये जानेवारीपासूनच गुलाबाच्या काढणीची आणि पॅकिंगची लगबग सुरू आहे.

आकाश झगडे
पिंपरी : 'व्हॅलेंटाइन्स डे' जवळ येत असतानाच, मावळातील गुलाबाला मागणी वाढली आहे. येथील पॉलीहाऊसमध्ये जानेवारीपासूनच गुलाबाच्या काढणीची आणि पॅकिंगची लगबग सुरू आहे.

पवना संस्कृतीअंतर्गत होणाऱ्या उत्पादनात यंदा दुपटीने वाढ झाली आहे. स्थानिक आणि परदेशी बाजारपेठेत या गुलाबाला चांगला भाव मिळत आहे.

तालुक्यात ४५० ते ५०० हेक्टर क्षेत्रावर गुलाबाची शेती होते. गेल्यावर्षी सुमारे साडेचार ते पाच कोटी गुलाबाच्या फुलांचे उत्पादन झाले होते. यंदा ५० ते ५५ लाख फुले निर्यात होण्याचा अंदाज आहे.

यामुळे २५ ते ३० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळणार आहे. यंदा थंडीचा कडाका कमी-जास्त होणे आणि ढगाळ हवामानामुळे उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी घट झाली आहे.

मात्र, फुलांचा दर्जा उत्कृष्ट असल्याने मागणी अधिक आहे गेल्या वर्षी १६ ते १८ रुपये असलेला निर्यात होणाऱ्या फुलांचा दर यंदा २० रुपयांच्या आसपास आहे. दरामध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

कोलकाता, बंगळुरू आणि चंदीगडला विक्री
अमेरिका, हॉलंड (नेदरलँड्स), जपान, ब्रिटन, दुबई (युएई), सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांसह देशांतर्गत दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, बंगळुरू आणि चंदीगड या बाजारपेठांतमावळचा गुलाब जात आहे. या गुलाबाला आता मागणी वाढली आहे.

परदेशात पाठवण्याचा असा असतो प्रवास
◼️ फुले खुडल्यानंतर ती तातडीने प्रतवारी करून स्थानिक बाजारपेठेत पाठवली जातात.
◼️ मात्र, परदेशात गुलाब पाठवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे.
◼️ खुडल्यानंतर ती तीन ते चार अंश तापमानात प्री-कूलिंग रूममध्ये ठेवली जातात.
◼️ वीस फुलांचा एक गुच्छ बनवून तो विशेष कोरोगेटेड बॉक्समध्ये ठेवला जातो.
◼️ हे बॉक्स कोल्ड स्टोअरेज असलेल्या व्हॅनमधून मुंबईच्या विमानतळावर नेले जातात.
◼️ निर्यातीपूर्वी केंद्र सरकारकडून कीडमुक्त असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते.

असा आहे दर
गेल्या वर्षी स्थानिक बाजारपेठेत गुलाबाला १८ ते २० रुपये दर मिळला होता. तो यंदा २५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. परदेशी बाजारपेठेतील २० रुपये दरापेक्षा पाच रुपये जादा मिळतात.

दरातील तुलना (प्रतिनग) वर्ष
शेतकऱ्यास मिळणारा दर - किरकोळ बाजार
◼️ २०२५ : ₹१५ ते २२ - ४० ते ६०
◼️ २०२६ :  ₹२० ते ३० - ५० ते ८०

टॉप सिक्रेट आणि ताजमहालची भुरळ
◼️ मावळात ताजमहाल (गडद लाल), टॉप सिक्रेट (गडद लाल), गोल्ड स्ट्राइक (पिवळा), अ‍ॅव्हलांच (पांढरा), बोर्डो (गडद लाल), सोफिया लॉरेन (गुलाबी) या जातींचे उत्पादन होते.
◼️ 'व्हॅलेंटाइन्स डे'ला गडद लाल रंग, लांब दांडा आणि जास्त काळ टिकाऊपणा यामुळे टॉप सिक्रेट, ताजमहाल यांना जास्त मागणी असते.
◼️ फूल शेतीमुळे मावळात सुमारे ५००० प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला असून, यात ६५ ते ७० टक्के महिलांचा सहभाग आहे.
◼️ पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर यांनी सांगितले की, यंदा हवामानामुळे काहीशी कसरत करावी लागली तरी व्हॅलेंटाइन्स डेचा हंगाम समाधानकारक आहे.

जादा उत्पादनासोबत काळजीही घ्यावी लागते. पॉलीहाऊसमध्ये उत्पादन घेणाऱ्या व परदेशात फुले पाठवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडे शीतगृह असणे गरजेचे आहे. निर्यातीसाठी शेतकरी एकत्र आले पाहिजेत. सरकारकडून छोटी शीतगृहे उभारली गेली पाहिजेत. - ज्ञानेश्वर ठाकर, सचिव, पवना फूल उत्पादक संघ

अधिक वाचा: जमीन 'एनए' करण्यासाठी आता परवानगीची गरज नाही; काय आहे नवीन निर्णय? वाचा सविस्तर

Web Title : वैलेंटाइन डे के लिए मावल के गुलाबों की मांग; निर्यात में उछाल

Web Summary : मावल के गुलाब किसानों को वैलेंटाइन डे के लिए 50-55 लाख फूलों के निर्यात की उम्मीद है, जिससे संभावित रूप से ₹25-30 करोड़ की विदेशी मुद्रा अर्जित होगी। मौसम के कारण उत्पादन में थोड़ी गिरावट के बावजूद, उच्च गुणवत्ता ने मांग और कीमतों को बढ़ाया है, जिससे स्थानीय किसानों को लाभ हुआ है।

Web Title : Maval Roses in Demand for Valentine's Day; Exports Soar

Web Summary : Maval's rose farmers anticipate exporting 50-55 lakh flowers for Valentine's Day, potentially earning ₹25-30 crore in foreign exchange. Despite a slight production dip due to weather, high quality has boosted demand and prices, benefiting local farmers.