नातेपुते : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचून, विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या मार्गावर निघतो.
यंदा ५ जुलै २०२५ रोजी पालखी पंढरपूरमध्ये दाखल झाली असून, गुरुवार १० जुलैपासून परतीचा प्रवास सुरू होणार आहे. पंढरपूरहून
निघाल्यानंतर पुढीलप्रमाणे मुक्काम होतील.
कुठे कधी मुक्काम?
१० जुलै : वाखरी येथे पहिला मुक्काम
११ जुलै : वेळापूर
१२ जुलै : नातेपुते
१३ जुलै : फलटण
१४ जुलै : पाडेगाव
१५ जुलै : वाल्हे
१६ जुलै : सासवड
१७ जुलै : हडपसर
१८ व १९ जुलै : पुणे
२० जुलै : आळंदीला पोहोचणार आहे.
आळंदी येथे नगरप्रदक्षिणा करून श्री माउली मंदिरात पालखी पोहोचते आणि सोहळ्याची सांगता होते. पालखीच्या परतीच्या प्रवासासाठी प्रशासनाने वाहतूक, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, अग्निशमन अशा सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील स्थानिक प्रशासन, पोलिस व आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत. दरम्यान, वारकरी भक्त परतीच्या मार्गावरही टाळ-मृदुंगाच्या गजरात, भक्तिरसात सहभागी होत आहेत.
पालखीच्या स्वागतासाठी मार्गावरील गावांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सध्या उत्साहात, भक्तिपूर्ण वातावरणात सुरू आहे.
अधिक वाचा: तुकडेबंदी कायद्या संदर्भात महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला होणार फायदा? जाणून घ्या सविस्तर