Join us

Maka Lagwad : यंदा मका पिक सगळ्या बाजूने ठरतंय गेम चेंजर; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 14:26 IST

मक्याचा वापर वेगवेगळ्या पशुखाद्यांमध्ये वाढल्यामुळे मक्याला मागणी वाढली. मक्याच्या ओल्या चाऱ्यापासून उत्कृष्ट मुरघास तयार केले जाते. मक्याची ओली व सुकी वैरण जनावरांसाठी उपयुक्त ठरत आहे.

मक्याचा वापर वेगवेगळ्या पशुखाद्यांमध्ये वाढल्यामुळे मक्याला मागणी वाढली. मक्याच्या ओल्या चाऱ्यापासून उत्कृष्ट मुरघास तयार केले जाते. मक्याची ओली व सुकी वैरण जनावरांसाठी उपयुक्त ठरत आहे.

सर्व प्रकारची जमीन, हवामानाशी जुळवणारे शेतकऱ्याला हमखास उत्पन देणारे म्हणून मक्याची ओळख आहे. इतर पिकांच्या बाबतीत हवामानात होणारे अचानक बदल वेगवेगळ्या समस्यांवर उपाय व मोठ्या प्रमाणात होणारा मक्याचा उपयोग यामुळे खरीप व रब्बी व उन्हाळ्यातही मक्याला पसंती मिळत आहे.

गेल्या काही वर्षापासून ज्वारी, बाजरी, भुईमूग अशा पिकांना फाटा देत मक्याचे क्षेत्र झपाट्याने वाढत चालल्याने तालुका मका उत्पादनात अग्रेसर ठरत आहे.

सध्या गावोगावच्या शिवारात मक्याचे अनेक फड डोलताना दिसत आहेत काढणीला आलेली मका बेताची आहे. मात्र सध्या हुरड्यात आलेल्या मकाचे क्षेत्र जादा असून नव्या लागवडीत ही वाढ होताना दिसत आहे.

हमखास उत्पन्नाचे पीक म्हणून मक्याला पसंती ऊस, केळी यासारखी पिकांना खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही, त्यामुळे कमी दिवसात हमखास आर्थिक उत्पन्न देणारे व जनावरच्या चाऱ्यासाठी उपयुक्त म्हणून मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली.

बदलत्या हवामानात तग धरणारे पीक म्हणून याकडे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. मक्याला मोठी मागणी आहे कारण वेगवेगळ्या प्रकारचे पशुखाद्यात मक्याचा प्रामुख्याने वापर होतो.

मका ठरत आहे बहुउपयोगीहुरड्यातील मका विक्रीसाठी वापरल्या जातात शिवाय हिरवा चारा, व मक्याचे उत्पादन व उरलेला वाळला चारा म्हणून उपयोग होतो मक्यापासून विविध प्रकारची पशुखाद्यासाठी मोठी मागणी आहे. याशिवाय मक्यापासून स्टार्च अल्कोहोल निर्मितीचे प्रयोगही यशस्वी झाले आहेत. त्यामुळे मक्याच्या पिकाचा पुरेपूर उपयोग होत असल्यामुळे सध्या इतर पिकांपेक्षा बहुगुणी म्हणून मक्याकडे पाहिले जाते.

मक्याचा आर्थिक आधारमक्याचे एकरी ४० ते ५० क्विंटलपर्यंत उत्पादन निघते. मक्याचा वापर वेगवेगळ्या पशुखाद्यामध्ये वाढल्यामुळे मक्याला मागणी वाढत आहे. शिवाय मक्याच्या ओल्या चाऱ्यापासून उत्कृष्ट मुरघास तयार केले जाते. शिवाय मक्याची ओली व वाळली वैरण जनावरांसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे मक्याच्या विविध जाती संकरित वाण मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. उपलब्ध होणाऱ्या जवळच्या बाजारपेठेमुळे अनेक शेतकरी मका शेती करणे पसंत करीत आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक त्यावेळी मका बाजारात नेऊन योग्य वेळी त्यांना आर्थिक आधार मिळत आहे.

अधिक वाचा: Khodwa Us : उसाचा खोडवा ठेवणार असाल तर ह्या ६ गोष्टी करू नका; वाचा सविस्तर

टॅग्स :मकापीकशेतीशेतकरीरब्बीखरीपरब्बी हंगामपीक व्यवस्थापनदुग्धव्यवसायऊस