Join us

MAGNET Project : मॅग्नेट प्रकल्पात अजून चार नवीन पिकांची भर, आला नवीन जीआर; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:34 IST

Magnet Project Maharashtra आशियाई विकास बँकेने दिलेल्या मान्यतेनुसार दि. १४.०४.२०२३ पासून आणखी ४ पिकांचा समावेश करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (Maharashtra Agribusiness Network-MAGNET) प्रकल्प ६ वर्षासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

सदर प्रकल्पामध्ये डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी व मिरची (हिरवी व लाल), फुलपीके याप्रमाणे ११ फलोत्पादन पीके व फुलपीके यांचा समावेश होता.

सदर फलोत्पादन पिके व फुलपिके यांच्या मुल्यसाखळ्या विकासित करणे, खाजगी गुंतवणुक आकर्षित करणे, फळे/भाजीपाल्याचे काढणी पश्चात नुकसान कमी करणे, वितरणक्षमता कार्यक्षम करणे आणि शेतकरी उत्पादक संस्थांचा मुल्यसाखळीतील सहभाग वाढविणे व महिला व दुर्बल घटकांचा सहभाग वाढविणे हे प्रकल्पाचे मुख्य उद्देश आहेत.

महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली "राज्यस्तरीय प्रकल्प सुकाणू समिती" स्थापना करण्यात आली आहे.

सदर समितीच्या दि.२७.०३.२०२३ रोजी झालेल्या बैठकीत सुकाणू समितीने, आशियाई विकास बँकेकडून आणखी आंबा, काजू, लिंबू व पडवळ या ४ पिकांचा मॅग्नेट प्रकल्पामध्ये समावेश करण्यास मान्यता प्राप्त झाल्यानंतर, प्रकल्प व्यवस्थापन पुस्तिकेत ज्या ठिकाणी ११ पिकांचा उल्लेख असेल त्या ठिकाणी १५ पिकांचा उल्लेख करण्यास व त्याअनुषंगाने अनुषंगीक बदल करण्यास मान्यता दिली आहे.

त्यानुसार आंबा, काजू, लिंबू व पडवळ या ४ पिकांचा मॅग्नेट प्रकल्प व्यवस्थापन पुस्तिकेत समावेश करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे मॅग्नेट प्रकल्पांतर्गत समाविष्ट फळ-फुलपिकांची एकूण संख्या १५ झाली आहे. यासाठी पुढीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) या प्रकल्पामध्ये समाविष्ट डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी व मिरची (हिरवी व लाल), फुलपीके या ११ फलोत्पादन पीके व फुलपीके यामध्ये आशियाई विकास बँकेने दिलेल्या मान्यतेनुसार दि. १४.०४.२०२३ पासून आंबा, काजू, लिंबू व पडवळ या आणखी ४ पिकांचा समावेश करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. त्यामुळे मॅग्नेट प्रकल्पांतर्गत समाविष्ट फळ-फुलपिकांची एकूण संख्या १५ होईल.

अधिक वाचा: FSSAI License : अन्न प्रक्रिया व्यवसायासाठी ऑनलाईन परवाना कसा काढाल? वाचा सविस्तर

टॅग्स :फलोत्पादनफळेभाज्याशेतकरीशेतीफुलंफुलशेतीराज्य सरकारसरकारबँकमहाराष्ट्रव्यवसायआंबाकृषी योजना