गारगोटी : उसतोडणी मजुरांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने नवीन कायदा करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. या नवीन कायद्यामुळे उसतोडणी मजुरांकडून होणाऱ्या लुटीला चाप बसणार आहे.
प्रवीण शेट्टी म्हणाले, याआधी गृह खाते, पोलिस ठाण्यात ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवून घेत नव्हते. परंतु, संघटनेच्या रेट्यामुळे आज अखेर जिल्ह्यात फसवणुकीचे सोळाशे गुन्हे नोंद झाले आहेत.
११ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून कायद्यामध्ये बदल करावा तसेच ५० टक्के रक्कम भरल्याखेरीज जामीन देऊ नये, यासह अन्य मागण्यांचे निवेदन संघटनेने दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.
ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मुकादम, ऊसतोडणी मजूर यांच्यात उचलीच्या (अग्रीम) रकमेवरून होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक टळावी, त्यामुळे होणारे गुन्हे थांबावेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये.
तसेच उसतोडणी मजुरांसह सर्वांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, एकाही घटकावर अन्याय होऊ नये, यासाठी ऊसतोडणी मुकादम व मजुरांचे संनियंत्रण करणाऱ्या सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करण्यात यावा, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
ते म्हणाले, स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष राजू शेट्टी, मार्गदर्शक पृथ्वीराज पवार यांनी ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादम व मजुरांविरोधात सातत्याने शासन दरबारी आवाज उठवला होता.
ऊस वाहतूक मालकांचा सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चाही काढला होता. त्यावेळी त्यांनी सरकारला मुंबई मंत्रालयाकडे मोर्चा वळवण्याचा इशारा दिला.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. आज त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे.
११ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून कायद्यामध्ये बदल करावा तसेच ५० टक्के रक्कम भरल्याखेरीज जामीन देऊ नये, यासह अन्य मागण्यांचे निवेदन संघटनेने दिले होते.
लोकमत' चे योगदानप्रवीण शेट्टी म्हणाले, पंडिवरे (ता. भुदरगड) येथील ऊस वाहतूकदारांची आत्महत्या व ऊस वाहतूकदारांच्या होत असलेल्या फसवणुकीबाबत सातत्याने लोकमतने आपल्या वृत्तपत्रातून प्रसिद्धी दिली. या बातमींची कात्रणे मंत्र्यांना दाखवली. बातमीच्या माध्यमातून या लढ्याला ताकद देण्याचे काम लोकमतने केले आहे. स्वाभिमानी वाहतूक संघटनेच्या ३ लढ्याला यश आल्याची प्रतिक्रिया देऊन राज्य सचिव प्रवीणकुमार शेट्टी यांनी लोकमतचे आभार मानले.
अधिक वाचा: पशुसंवर्धन विभागात या पदासाठी मोठी भरती; २७९५ रिक्त पदे लवकरच भरणार