राज्यात कांद्याचा दर घसरल्याने कालपासून राज्यात १२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो या दराने कांदा खरेदी करून शासन शेतकऱ्यांना दिलासा देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.
शेतकरी व शेती समृद्ध करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून पश्चिम आशियातील व बांगलादेशातील संकटामुळे कांद्याचे भाव पडले होते.
कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याने केंद्रीय कृषी मंत्री यांना विनंती केल्यानुसार त्यांनी १२.३५ रुपये दराने कांदा खरेदी सुरु केली आहे, असे सांगून ते म्हणाले, यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कापूस, सोयाबीन, तुरीसह अनेक पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. साखरेच्या एमएसपीसंदर्भात लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल.
साखर कारखानदारांची दिल्लीत बैठक घेणार
येणाऱ्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री यांची वेळ घेऊन साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावरील संकट दूर करण्यासाठी बैठक घेण्यात येईल व साखरेच्या किमान विक्री दराबाबत केंद्राकडे पाठपुरावा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा: Monsoon Update : नैर्ऋत्य मान्सून येण्याची तारीख जाहीर; किती तारखेला दाखल होणार मान्सून?
