Mango Juice Recipe : आमरसासाठी (Aamras) आंब्याची निवड करताना चव, सुगंध आणि गराचा पोत या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आमरसासाठी कुठला आंबा बेस्ट मानला जातो. कुणाला सर्वाधिक पंसती मिळते आणि आमरस बनविताना काय काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात...
हापूस : हापूस हा आमरसासाठी राजा मानला जातो. रत्नागिरी किंवा देवगडचा हापूस त्याच्या गडद नारंगी रंग, दाटपणा आणि उत्कृष्ट गोडव्यामुळे सर्वोत्तम आहे.
केशर (Kesar) : केशर आंबा हा आमरसासाठी अत्यंत लोकप्रिय पर्याय आहे, विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांत. हा आंबा गोड असतो आणि त्याचा वास अतिशय सुगंधी असतो.
पायरी (Pairi) : हा आंब्याचा प्रकार आमरसासाठी पारंपारिक आणि अत्यंत चविष्ट मानला जातो. हापूसपेक्षा पायरी अधिक रसाळ (Juicy) असतो आणि आंबट-गोड चवीमुळे आमरसाला छान चव देतो.
बदामी (Badami) : हा आंबा स्वस्त आणि भरपूर गर देणारा असतो. तो मऊ असल्याने मिक्सरमध्ये छान बारीक होतो आणि आमरसासाठी उत्तम पर्याय आहे.
आमरस बनवण्यासाठी खास टिप्स :
पूर्ण पिकलेले आंबे : आमरसासाठी नेहमी चांगले पिकलेले, मऊ आंबे निवडा.
पाण्यात भिजवणे : आंबे किमान १-२ तास पाण्यात भिजवून ठेवा, जेणेकरून त्यातील उष्णता कमी होईल.
रवीचा वापर : मिक्सरऐवजी हाताने किंवा रवीने गर काढल्यास आमरस अधिक चविष्ट लागतो आणि काळा पडत नाही.
दूध टाळा : आमरस साठवायचा असल्यास त्यात दूध घालणे टाळा, त्यामुळे तो लवकर खराब होऊ शकतो.
रेशन दुकानातुन रेशनच नाही, आता साडीही मिळणार! जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ?
