Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > रेशन दुकानातून प्रत्येकी एक मोफत साडी वाटप केली जाणार, 'या' रेशनकार्ड धारकांना मिळणार 

रेशन दुकानातून प्रत्येकी एक मोफत साडी वाटप केली जाणार, 'या' रेशनकार्ड धारकांना मिळणार 

Latest news One free saree will be distributed from each ration shop Benefits for Antyodaya Families | रेशन दुकानातून प्रत्येकी एक मोफत साडी वाटप केली जाणार, 'या' रेशनकार्ड धारकांना मिळणार 

रेशन दुकानातून प्रत्येकी एक मोफत साडी वाटप केली जाणार, 'या' रेशनकार्ड धारकांना मिळणार 

Ration shop Benefits : राज्य शासनाकडे संबधित लाभार्थी शिधापत्रिकाधारकांच्या संख्येनुसार साड्यांची मागणी नोंदविली आहे.

Ration shop Benefits : राज्य शासनाकडे संबधित लाभार्थी शिधापत्रिकाधारकांच्या संख्येनुसार साड्यांची मागणी नोंदविली आहे.

नाशिक : अंत्योदय रेशनकार्ड धारकांना अर्थात गोरगरीब कुटुंबांना मोफत साडी वाटप करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही रेशनदुकानांमधून प्रत्येकी एक साडी एका कुटुंबाला दिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी एकूण १ लाख ७६ हजार ६०५ साड्यांची मागणी जिल्हा पुरवठा शाखेकडून सरकारकडे नोंदविली आहे.

सुट्ट्या, लग्नसराईत आधार 
गोरगरीब कुटुंबांना रेशन दुकानातून प्रत्येकी एक मोफत साडी वाटप केली जाणार आहे. उन्हाळी सुट्टी व लग्नसराईत गोरगरीब कुटुंबातील महिलांना याचा मोठा आधार होणार आहे. जिल्हा पुरवठा शाखेकडून राज्य शासनाकडे अंत्योदय शिधापत्रिकाधारकांच्या संख्येनुसार साड्यांची मागणी नोंदविली आहे.

वर्षाला प्रतिकुटुंब एक मोफत साडी
शासनाकडून अंत्योदय कुटुंबाला दरवर्षी एक मोफत साडी दिली जाते. मागील वर्षापासून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यावर्षीही लवकरच साडी वाटपाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती पुरवठा शाखेकडून देण्यात आली.

'ई-पॉस'द्वारे होणार वितरण
रास्त भाव दुकानातून 'ई-पॉस' यंत्राद्वारे जसे धान्य वितरण केले जाते, त्याचप्रमाणे अंत्योदय कुटुंबातील लाभार्थीला प्रत्येकी एक साडीचे वितरण केले जाणार आहे. त्यासाठीसुद्धा ई-पॉस यंत्राचा वापर केला जाणार आहे.

नोडल संस्था कोण..?
राज्य शासनाने कॅप्टीव मार्केट योजनेंतर्गत साड्यांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून नेमणूक केली आहे. महामंडळामार्फत साड्यांचे गढे अंत्योदय शिधापत्रिकाधारकांच्या याद्यांप्रमाणे तयार करून रास्तभाव दुकानाच्या नावानुसार विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या जिल्हा, तालुकास्तरावरील गोदामापर्यंत कापडी पिशवीसह पोहचविण्यात येणार आहे.

Web Title : राशन दुकानों से अंत्योदय राशन कार्ड धारकों को मुफ्त साड़ी।

Web Summary : नाशिक में अंत्योदय राशन कार्ड धारकों को राशन दुकानों के माध्यम से मुफ्त साड़ियाँ मिलेंगी। जिले ने सरकार से 1.76 लाख साड़ियों का अनुरोध किया है, जो गर्मी और शादी के मौसम में वंचित परिवारों को सहायता प्रदान करेगा। वितरण 'ई-पीओएस' प्रणाली के माध्यम से होगा।

Web Title : Free sarees for Antyodaya ration card holders through ration shops.

Web Summary : Antyodaya ration card holders in Nashik will receive free sarees through ration shops. The district has requested 1.76 lakh sarees from the government, providing support to underprivileged families during summer and wedding season. Distribution will be through 'e-POS' system.