बीड : बीडमध्येऊसतोड कामगारांसाठी दिलासादायक घोषणा करत उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister and Guardian Minister of the district Ajit Pawar) अजित पवार यांनी सानुग्रह अनुदानात दुप्पट वाढ करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले.(Ustod Kamagar)
राज्यातील ऊसतोड कामगारांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारकडून लवकरच येऊ शकतो. बीड जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister and Guardian Minister of the district Ajit Pawar) यांनी ऊसतोड कामगारांच्या सानुग्रह अनुदानात दुप्पट वाढ करण्याचा विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले. (Ustod Kamagar)
कार्यक्रमात जाहीर आश्वासन
जिल्हा परिषद आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बीड येथे "मिशन साथी" योजनेचा शुभारंभ आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, दुर्दैवाने एखाद्या ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्यास वारसांना मिळणारे ५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वाढवून १० लाख रुपये करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे.
अपघातामुळे अपंगत्व आलेल्या कामगारांना मिळणारी २.५ लाखांची मदत वाढवून ५ लाख रुपये करण्याचाही विचार सुरू आहे.
ऊसतोड कामगारांच्या कष्टांचे कौतुक
अजित पवार यांनी या प्रसंगी ऊसतोड कामगारांचा गौरव करताना सांगितले की, साखर कारखान्यांचा गाळप सुरळीत पार पाडण्यासाठी ऊसतोड कामगारांची मेहनत अनमोल आहे. त्यांच्या श्रमामुळेच राज्याची अर्थव्यवस्था भक्कम राहते.
तंत्रज्ञानातील बदलांवर भाष्य
ऊसतोडीमध्ये बॅटरीवर चालणारे कोयते, हार्वेस्टर, आणि ड्रोन तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडत असल्याचे पवार यांनी नमूद केले.
वाहतुकीसाठी बैलाऐवजी ट्रॅक्टरचा वापर वाढला असून, महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गटाने हार्वेस्टर खरेदीसाठी सहाय्य मिळावे यावरही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
"मिशन साथी" योजनेचा शुभारंभ
या कार्यक्रमात "मिशन साथी" योजनेअंतर्गत आरोग्य साथींना प्रथमोपचार किट प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार नमिता मुंदडा, आमदार धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळुंके यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.