Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > चोरांच्या भीतीनं साडे चार लाखांचं मंगळसूत्र गोठ्यात ठेवलं, तेच गाईन गिळलं, वाचा पुढे काय झालं? 

चोरांच्या भीतीनं साडे चार लाखांचं मंगळसूत्र गोठ्यात ठेवलं, तेच गाईन गिळलं, वाचा पुढे काय झालं? 

Latest News Three tolas of gold were safely removed by surgery on a cow's stomach | चोरांच्या भीतीनं साडे चार लाखांचं मंगळसूत्र गोठ्यात ठेवलं, तेच गाईन गिळलं, वाचा पुढे काय झालं? 

चोरांच्या भीतीनं साडे चार लाखांचं मंगळसूत्र गोठ्यात ठेवलं, तेच गाईन गिळलं, वाचा पुढे काय झालं? 

Agriculture News : चोरीच्या घटना वाढल्याने सुमारे तीन तोळ्यांची सोन्याची पोत रात्रीच्या वेळी गोणीत ठेवली.

Agriculture News : चोरीच्या घटना वाढल्याने सुमारे तीन तोळ्यांची सोन्याची पोत रात्रीच्या वेळी गोणीत ठेवली.

नाशिक : चोरांच्या भीतीपोटी घरातील महिलेने गायींच्या खाद्याच्या गोणीत हे मंगळसूत्र सुरक्षित ठेवले होते. मात्र, तेच अनावधानाने दुसऱ्या दिवशी खाद्य देतांना गायीच्या पोटात गेल्याने काही काळ कुटुंबीयांची धाकधूक वाढली होती. मात्र पशुवैद्यकांच्या शस्त्रक्रियेनंतर ते सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची आगळीवेगळी घटना सिन्नर तालुक्यातील दापूर येथे घडली. 

दापूर येथील शेतकरी अर्जुन संतू हळकुंडे यांचा बुवाजी बाबा मंदिराशेजारी गायींचा गोठा आहे. परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने त्यांच्या पत्नीने सुमारे तीन तोळ्यांची सोन्याची पोत रात्रीच्या वेळी गायींच्या खाद्याच्या गोणीत ठेवली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे अर्जुन हळकुंडे यांनी त्याच गोणीतून खाद्य काढून गायींना दिले. नकळत त्या खाद्यासोबत सोन्याची पोतही गायीच्या पोटात गेली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांची चिंता वाढली.

गायीच्या शेणातून पोत बाहेर येईल, अशी आशा त्यांना होती. मात्र, तीन-चार दिवस उलटूनही तसे न झाल्याने त्यांनी नांदूरशिंगोटे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय थोरात आणि डॉ. ऋषिकेश शेळके यांच्याशी संपर्क साधला.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी गायीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. 

सुमारे एक तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर गायीच्या पोटातून तीन तोळ्यांची सोन्याची पोत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे गायीचा जीवही वाचला आणि साडेचार लाख रुपये किमतीचे मंगळसूत्रही शेतकऱ्यांच्या हाती परत आले. पोत सुरक्षित मिळाल्याने हळकुंडे कुटुंबाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले. गायीलाही जीवदान मिळाल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

Web Title : चोरों के डर से: गाय ने चारा में छिपा सोने का हार निगल लिया।

Web Summary : नाशिक में, एक महिला ने चोरों से बचाने के लिए गाय के चारे में अपना हार छिपा दिया। गाय ने गलती से उसे खा लिया। डॉक्टरों ने सफलतापूर्वक ₹4.5 लाख का हार निकाला, जिससे गाय और परिवार की संपत्ति दोनों बच गईं।

Web Title : Fear of thieves: Cow swallows gold necklace hidden in feed.

Web Summary : In Nashik, a woman hid her necklace in cow feed to protect it from thieves. The cow accidentally ate it. Vets successfully removed the necklace, worth ₹4.5 lakhs, saving both the cow and the family's valuables.