Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > प्रतीक्षा संपली, पीएम किसानच्या 22 व्या हफ्त्याची तारीख ठरली, 'या' दिवशी मिळणार पैसे 

प्रतीक्षा संपली, पीएम किसानच्या 22 व्या हफ्त्याची तारीख ठरली, 'या' दिवशी मिळणार पैसे 

Latest News The 22nd week of PM Kisan will come to farmers' accounts on March 13 | प्रतीक्षा संपली, पीएम किसानच्या 22 व्या हफ्त्याची तारीख ठरली, 'या' दिवशी मिळणार पैसे 

प्रतीक्षा संपली, पीएम किसानच्या 22 व्या हफ्त्याची तारीख ठरली, 'या' दिवशी मिळणार पैसे 

Pm Kisan Scheme : याबाबतची अधिकृत माहिती कृषी विभागाच्या एक्स हँडलवर पोस्ट करण्यात आली आहे. 

Pm Kisan Scheme : याबाबतची अधिकृत माहिती कृषी विभागाच्या एक्स हँडलवर पोस्ट करण्यात आली आहे. 

Pm Kisan Scheme :  देशभरातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या २२ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून पुढील दोन दिवसांत म्हणजेच १३ मार्च रोजी पीएम किसानचा पुढील हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 

गेल्या अनेकदा दिवसांपासून शेतकरी पीएम किसानच्या २२ व्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. अनेकजण सांगत होते कि होळीला हा हफ्ता खात्यावर येईल, मात्र तसे झाले नाही. अखेर होळीनंतर हा २२ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. याबाबतची अधिकृत माहिती कृषी विभागाच्या एक्स हँडलवर पोस्ट करण्यात आली आहे. 

येत्या १३  मार्च रोजी पीएम किसान हफ्ता वितरित केला जाणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असून २२ वा हफ्ता वितरित होणार आहे. त्यामुळे देशातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून पुढील दोनच दिवसांत त्यांच्या खात्यावर २ हजार रुपये मिळणार आहेत. 

लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे
शेतकरी आगामी हप्त्यासाठी पात्र आहेत की नाही हे तपासण्यासाठी लाभार्थी यादी ऑनलाइन तपासू शकतात.

  • अधिकृत पीएम-किसान वेबसाइटला भेट द्या.
  • लाभार्थी यादी विभागात जा.
  • राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
  • यादी पाहण्यासाठी सबमिट करा वर क्लिक करा.

Web Title : पीएम किसान की 22वीं किस्त की तारीख तय: पैसा जल्द आएगा!

Web Summary : किसानों का इंतजार खत्म! पीएम किसान की 22वीं किस्त 13 मार्च को आएगी। लाखों किसानों को ₹2000 मिलेंगे। लाभार्थी सूची ऑनलाइन जांचें।

Web Title : PM Kisan 22nd Installment Date Fixed: Money Coming Soon!

Web Summary : Farmers' wait ends! The 22nd PM Kisan installment arrives March 13th. Lakhs of farmers will receive ₹2000. Check beneficiary list online.