Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Soybean Seed : सोयाबीन बियाण्यांवर मोठा खर्च टळणार; कृषी विभागाचा खास सल्ला

Soybean Seed : सोयाबीन बियाण्यांवर मोठा खर्च टळणार; कृषी विभागाचा खास सल्ला

latest news Soybean Seed: Big expenditure on soybean seeds will be avoided; Special advice from the Agriculture Department | Soybean Seed : सोयाबीन बियाण्यांवर मोठा खर्च टळणार; कृषी विभागाचा खास सल्ला

Soybean Seed : सोयाबीन बियाण्यांवर मोठा खर्च टळणार; कृषी विभागाचा खास सल्ला

Soybean Seed :आगामी खरीप हंगामासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या घरगुती बियाण्यांवर मोठा भर दिला असून त्यामुळे तब्बल १८५ कोटी रुपयांचा खर्च वाचणार आहे. जवळपास १.५४ लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी स्वतः कडे राखून ठेवले असून उगवण क्षमता तपासणीनंतरच या बियाण्यांचा पेरणीसाठी वापर केला जाणार आहे. कृषी विभागानेही बीज प्रक्रिया आणि उगवण चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.(Soybean Seed)

Soybean Seed :आगामी खरीप हंगामासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या घरगुती बियाण्यांवर मोठा भर दिला असून त्यामुळे तब्बल १८५ कोटी रुपयांचा खर्च वाचणार आहे. जवळपास १.५४ लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी स्वतः कडे राखून ठेवले असून उगवण क्षमता तपासणीनंतरच या बियाण्यांचा पेरणीसाठी वापर केला जाणार आहे. कृषी विभागानेही बीज प्रक्रिया आणि उगवण चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.(Soybean Seed)

वाशिम : आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन बियाण्यांवर भर दिल्याने मोठी आर्थिक बचत होणार आहे.(Soybean Seed)

गत हंगामातील उत्पादनातून शेतकऱ्यांनी स्वतः कडे राखून ठेवलेल्या आणि ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून तयार करण्यात आलेल्या तब्बल १ लाख ५४ हजार ८७५ क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा यंदा पेरणीसाठी वापर होणार आहे. (Soybean Seed)

त्यामुळे बाजारातून महागडे बियाणे खरेदी करण्यावरील जवळपास १८५ कोटी रुपयांचा खर्च वाचणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.(Soybean Seed)

जिल्ह्यात मागील तीन वर्षांत सरासरी २ लाख ९९ हजार ९७३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती.

यंदाच्या खरीप हंगामात जवळपास २.९५ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरा प्रस्तावित असून त्यासाठी सुमारे २ लाख २१ हजार २५० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे.

३५ टक्के बियाणे बदलाचा कार्यक्रम

कृषी विभागाने यंदा बियाणे बदलाचे प्रमाण ३५ टक्के निश्चित केले आहे. त्यानुसार ६६ हजार ३७५ क्विंटल प्रमाणित बियाण्यांची मागणी महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ आणि खासगी कंपन्यांकडे नोंदविण्यात आली आहे.

यामध्ये महाबीजचा सर्वाधिक वाटा असून उर्वरित बियाणे खासगी आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळामार्फत उपलब्ध होणार आहेत.

६६,३७५ क्विंटल बियाण्यांमध्ये वाटा

महाबीज : ४४,०८८ क्विंटल

राष्ट्रीय बियाणे महामंडळ : १९,२८७ क्विंटल

खासगी कंपन्या : ३,००० क्विंटल

उर्वरित १.५४ लाख क्विंटल बियाणे हे शेतकऱ्यांनी स्वतः कडे राखून ठेवलेल्या साठ्यातून आणि ग्रामबिजोत्पादन मोहिमेद्वारे उपलब्ध होणार आहे.

उगवण चाचणीनंतरच पेरणीचा सल्ला

कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरगुती बियाण्यांचा वापर करण्यापूर्वी उगवण क्षमता तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचेही सांगितले आहे.

उगवण चाचणीत योग्य ठरलेली बियाणेच पेरणीसाठी वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सोयाबीन बियाण्यांचे बाजारातील दर सध्या सरासरी १२० रुपये प्रति किलो आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरगुती बियाण्यांचा वापर केल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होणार आहे.

मागील तीन वर्षांतील बियाणे विक्री

२०२३ : ९०,२२४ क्विंटल

२०२४ : ६६,९८५ क्विंटल

२०२५ : ७६,४०४ क्विंटल

यंदा मात्र ग्रामबिजोत्पादन मोहिमेमुळे घरगुती बियाण्यांचा वापर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

खरीप हंगामासाठी तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी आदी पिकांच्या बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली असून बियाणे उपलब्ध होत आहेत. बीज प्रक्रिया आणि उगवण चाचणीनंतर घरगुती बियाण्यांचा वापर करण्यात येणार आहे. - आरिफ शहा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ग्रामबिजोत्पादन मोहिमेद्वारे घरगुती बियाण्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. योग्य उगवण क्षमता तपासल्यानंतरच ही बियाणे पेरणीसाठी वापरण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.- अभिजित देवगिरकर, कृषी विकास अधिकारी

हे ही वाचा सविस्तर : Aaple Sarkar Kendra : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 'आपले सरकार' केंद्रांवर पारदर्शकता; नवा नियम लागू

अधिक वाचा : Cotton Farming : एकेकाळचा 'कॉटन बेल्ट' आज ओसाड; 'या' जिल्ह्यात कापसाला काय झाले?

Web Title: latest news Soybean Seed: Big expenditure on soybean seeds will be avoided; Special advice from the Agriculture Department