Aaple Sarkar Kendra : राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्रां'वर नागरिकांकडून घेतल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्कावर लगाम लावण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.(Aaple Sarkar Kendra)
आता प्रत्येक सेवा केंद्रावर सुधारित दरपत्रक आणि क्यूआर कोड लावणे बंधनकारक करण्यात आले असून, यामुळे पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.(Aaple Sarkar Kendra)
काय आहे नवीन नियम?
* प्रत्येक 'आपले सरकार' सेवा केंद्राच्या दर्शनीभागावर अधिकृत दरपत्रक लावणे आवश्यक
* सर्व सेवांसाठी स्वतंत्र क्यूआर कोड उपलब्ध
क्यूआर स्कॅन केल्यावर मिळणार:
अधिकृत शुल्क माहिती
आवश्यक कागदपत्रांची यादी
जवळच्या सेवा केंद्रांची माहिती
तक्रार नोंदविण्याची सुविधा
अवाजवी शुल्काच्या तक्रारींवर कारवाई
जातप्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन-क्रिमिलेअर, रहिवासी दाखला यांसारख्या सेवांसाठी शासनाने ठरवलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे घेतल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत होत्या.
आता जर अतिरिक्त पैसे मागितले
दाखला देण्यास विलंब केला
एजंटमार्फत पैसे मागितले
तर नागरिक क्यूआर कोड स्कॅन करून थेट ऑनलाइन तक्रार करू शकतात.
सेवा केंद्रांना मिळणार रेटिंग सिस्टम
नागरिकांना सेवा मिळाल्यानंतर रेटिंग देण्याची सुविधा
चांगल्या सेवांना सकारात्मक अभिप्राय
खराब सेवांची थेट प्रशासनाकडे नोंद
एखाद्या केंद्राला ५% पेक्षा जास्त नकारात्मक अभिप्राय मिळाल्यास तपासणी होणार
गंभीर प्रकार आढळल्यास परवाना निलंबन किंवा रद्द होऊ शकतो
नागरिकांसाठी मोठा दिलासा
या नव्या प्रणालीमुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पारदर्शक शुल्क माहिती
वेळेवर सेवा
फसवणुकीपासून संरक्षण
तक्रार नोंदविण्याचा सोपा मार्ग मिळणार आहे.
त्यामुळे 'आपले सरकार' सेवा केंद्रांवरील अनियमितता आणि लूट थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा सविस्तर : Gas New Rules Update : १ मेपासून गॅस मिळवणं सोपं नाही; 'हे' नवे नियम जाणून घ्या
अधिक वाचा : Super El Nino Alert : भारतावर 'हीट डोम' तयार झालाय; याचा नेमका अर्थ काय?
