Lokmat Agro >शेतशिवार > Solar Kumpan Yojana : सोलर कुंपण योजनेत 100 टक्के अनुदान मिळणार, जाणून घ्या सविस्तर 

Solar Kumpan Yojana : सोलर कुंपण योजनेत 100 टक्के अनुदान मिळणार, जाणून घ्या सविस्तर 

Latest news solar kumpan yojana Solar Fence Scheme will get 100 percent subsidy, know the details | Solar Kumpan Yojana : सोलर कुंपण योजनेत 100 टक्के अनुदान मिळणार, जाणून घ्या सविस्तर 

Solar Kumpan Yojana : सोलर कुंपण योजनेत 100 टक्के अनुदान मिळणार, जाणून घ्या सविस्तर 

Solar Kumpan Yojana : शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोलर कुंपणाची (Solar Kumpan Yojana) मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

Solar Kumpan Yojana : शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोलर कुंपणाची (Solar Kumpan Yojana) मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचे होणारे नुकसान, पशुधनावर होणारे हल्ले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोलर कुंपणाची (Solar Kumpan Yojana) मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. हीच मागणी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आली आहे. या अनुषंगाने वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून सोलर कुंपण योजनेसाठी शंभर टक्के अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या सरकारमध्ये सोलर कुंपण योजना (Solar Fencing Scheme) राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. तसेच शेतकऱ्यांना सोलर कुंपण देखील उपलब्ध करून देण्यात येत होते.  अनेक अडथळे या योजनेत पाहायला मिळाले. यापूर्वी या योजनेत 75 टक्के अनुदान म्हणजेच जवळपास 15 हजार रुपयांचा अनुदान मिळत होतं, मात्र आता हे अनुदान थेट शंभर टक्के मिळणार असून शेतकऱ्यांना 20 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

एकंदरीत श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर कुंपण देण्याची बाब समाविष्ट करण्यात आली आहे. ही योजना मात्र महाराष्ट्रातील काही निवडक गावांमध्ये राबवली जाते. वनालगतची जी काही क्षेत्र आहेत, अशा क्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत आहे. अशा गावांची यादी वेळोवेळी शासनाकडून प्रसारित करण्यात येते. प्रत्येक वर्षी या यादीमध्ये काही नवीन गावांचा देखील समावेश करण्यात येतो. 

अर्ज करण्याची स्थिती तपासा 
सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर  जाऊन आपल्या लॉगिन आयडीद्वारे लॉगिन करायचे आहे.
लॉग इन केल्यानंतर अर्ज करामध्ये गेल्यानंतर आपल्याला खाली सौर कुंपण योजना अशी बाब दाखवली जाईल. 
या बाबीवर क्लिक करायचं आहे, केल्यानंतर अर्ज भरत असताना जर तुमचा गाव या योजनेअंतर्गत समाविष्ट असेल तरच या अंतर्गत तुम्हाला अर्ज सबमिट करता येणार आहे. जी गाव या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत त्या गावातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहेत.

Web Title: Latest news solar kumpan yojana Solar Fence Scheme will get 100 percent subsidy, know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.