Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > चतुर शेतकरी! पक्षांकडून करतो कीटक नियंत्रण, वाशिमच्या शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग यशस्वी

चतुर शेतकरी! पक्षांकडून करतो कीटक नियंत्रण, वाशिमच्या शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग यशस्वी

Latest news Smart farmer Pest control using birds, innovative experiment successful | चतुर शेतकरी! पक्षांकडून करतो कीटक नियंत्रण, वाशिमच्या शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग यशस्वी

चतुर शेतकरी! पक्षांकडून करतो कीटक नियंत्रण, वाशिमच्या शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग यशस्वी

Agriculture News : कृषितज्ज्ञांच्या मते, या पद्धतीमुळे अळ्यांचे प्रमाण कमी होऊन रासायनिक कीटकनाशकांचा वापर घटतो.

Agriculture News : कृषितज्ज्ञांच्या मते, या पद्धतीमुळे अळ्यांचे प्रमाण कमी होऊन रासायनिक कीटकनाशकांचा वापर घटतो.

वाशिम : बदलते हवामान, वाढते कीड-रोग आणि रासायनिक खर्च याच्या पार्श्वभूमीवर बेलोरा (ता. मानोरा) येथील प्रगतशील शेतकरी विशाल ठाकरे यांनी चवळी पिकात ज्वारी-बाजरीची झाडे लावून 'नैसर्गिक पक्षी थांबे' तयार करण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी केला.

ठाकरे यांनी चवळीच्या पिकात लावलेल्या ज्वारी व बाजरीच्या उंच झाडांमुळे पक्ष्यांना बसण्यासाठी ठिकाण मिळते. त्यामुळे विविध पक्षी हानिकारक किडींवर नैसर्गिक नियंत्रण करतात. 

जैवविविधतेचे संवर्धन
कृषितज्ज्ञांच्या मते, या पद्धतीमुळे अळ्यांचे प्रमाण कमी होऊन रासायनिक कीटकनाशकांचा वापर घटतो, परिणामी उत्पादन खर्चात बचत होते. तसेच जैवविविधतेचे संवर्धन होऊन शेतीतील पर्यावरण संतुलन राखले जाते.

तालुका कृषी अधिकारी रोशन भागवत व मंडळ अधिकारी उमेश राठोड यांनी शेताला भेट देऊन प्रयोगाची पाहणी केली व शेतकऱ्याच्या प्रयोगाचे कौतुक केले. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारा हा प्रयोग भविष्यात राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरण्याची शक्यता आहे.

चवळी पिकात ज्वारी-बाजरीचे 'पक्षी थांबे' तयार करणे ही अत्यंत प्रभावी व शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांनीही अवलंबल्यास शाश्वत शेतीला मोठी चालना मिळेल.
- रोशन भागवत, तालका कृषी अधिकारी

 

विहिरीत सापडली चौदाव्या शतकातील गधेगळ, गधेगळ म्हणजे काय, त्याच इतिहासात काय महत्व?

 

Web Title : चतुर किसान ने पक्षियों से किया कीट नियंत्रण, मिली सफलता

Web Summary : वाशिम के किसान विशाल ठाकरे ने चवली की फसल में ज्वार और बाजरा लगाकर पक्षियों को आकर्षित किया और प्राकृतिक कीट नियंत्रण पाया। इससे कीटनाशक का उपयोग कम हुआ, लागत घटी, जैव विविधता बढ़ी और कृषि पर्यावरण संतुलित रहा। कृषि अधिकारियों ने इस किफायती और उत्पादक तरीके की सराहना की, जो राज्य भर के किसानों का मार्गदर्शन कर सकता है।

Web Title : Innovative Farmer Uses Birds for Pest Control, Achieves Success

Web Summary : Washim farmer Vishal Thackeray successfully uses sorghum and millet in cowpea crops to attract birds for natural pest control. This reduces pesticide use, cuts costs, promotes biodiversity, and balances the agricultural environment. Agricultural officers praised the cost-effective and productive method, potentially guiding farmers statewide towards sustainable farming.