Agriculture News : रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एका गावातील विहिरीचा गाळ काढताना ऐतिहासिक दस्तऐवज आढळून आला आहे. हा एकप्रकारचा शिलालेख असून तो गधेगळ प्रकारातील असल्याचे समोर आले आहे. आता गधेगळ म्हणजे काय, त्याच इतिहासातील काय महत्व आहे, पाहुयात...
तर इतिहासाच्या साधनांमध्ये लिखित साधने म्हणजे लेखी दस्तऐवज, ग्रंथ, पत्रे आणि मौखिक साधनामध्ये लोककथा, ओव्या, पोवाडे यांचा समावेश होतो. ही साधने इतिहासाच्या अभ्यासाचे प्रमुख आधार आहेत. यापैकी विहिरीत सापडलेली शिळा ही शिलालेखांपैकी एक असून तो लिखित साधनाचा प्रकार आहे. त्यातही गधेगळ या प्रकारातील आहे.
आता गधेगळ म्हणजे काय तर महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील एक वैशिष्ट्यपूर्ण शिलालेख आहे. ज्यावर एका गाढवाची आकृती कोरलेली असते. हे प्रामुख्याने राजाचा आदेश न पाळल्यास मिळणाऱ्या शिक्षेचे किंवा शापाचे प्रतीक मानले जाते.
गधेगळ हा एक प्रकारचा शिलालेख असतो. हा शिलालेख ३ भागात विभागलेला असतो. वरच्या टप्प्यात चंद्र, सूर्य आणि कलश यांच्या प्रतिमा यावर कोरलेल्या असतात.
गधेगळाची प्रमुख वैशिष्ट्ये :
स्वरूप : हे सामान्यतः दगडावर कोरलेले शिल्प/शिलालेख असतात.
हेतू : हे प्राचीन काळी जमिनीचे हक्क, गावच्या सीमा किंवा राजाचे आदेश पक्के करण्यासाठी लावले जात असत.
कालावधी : हे प्रामुख्याने यादव, शिलाहार, कदंब आणि बहामनी काळातील मानले जातात.
