Shet Raste : गावातील धूळ, खड्ड्यांनी भरलेले रस्ते आता इतिहासजमा होणार आहेत. 'मुख्यमंत्री ग्रामसडक योजने'तून नागपूर जिल्ह्यात सुमारे ५० किलोमीटर सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. (Shet Raste)
यामुळे गावांतील प्रवास सुकर होणार असून शेतकऱ्यांची शेतवाट चकाचक होणार आहे.(Shet Raste)
शासनाच्या या पुढाकारामुळे शेती, व्यापार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Shet Raste)
योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सुसज्ज आणि टिकाऊ रस्त्यांचे जाळे उभे राहत आहे.(Shet Raste)
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नेमकी आहे तरी काय?
ही योजना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राबवली जाते. यात राज्यातील वाड्या-वस्त्यांना, विशेषतः १ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना मुख्य रस्त्यांशी जोडण्यावर भर दिला जातो. तसेच आधीपासून अस्तित्वात असलेल्या पण खराब स्थितीत असलेल्या रस्त्यांची दर्जोन्नती केली जाते.
नागपूर जिल्ह्यातील रस्त्यांची सद्यस्थिती
टप्पा १: ३७२ रस्त्यांचे उद्दिष्ट; १,२०० किमी काम पूर्ण.
(प्रत्येकी खर्च ₹८० लाख प्रति किमी)
टप्पा २: ११२ नवीन रस्त्यांची कामे सुरू; ५४४ किमीचे उद्दिष्ट.
सिमेंट काँक्रीट रस्ते: विशेषतः ५० किमी लांबीचे काम मंजूर; सुरूवात झाली आहे.
शेतकऱ्यांना थेट फायदा
या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना पिकं आणि उत्पादन बाजारात पोहोचवताना वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत. पावसाळ्यात किचकट होणाऱ्या शेतवाटा आता सिमेंटमुळे सुरक्षित होतील. या मार्गांनी ट्रॅक्टर, बैलगाड्या व अन्य वाहने आता अधिक सहजपणे जाऊ शकतील.
प्रगतीचा मार्ग खुला
सिमेंटचे रस्ते तयार झाल्यानंतर गावात आरोग्य सुविधा, शाळा, रोजगार व व्यापारासाठी संधी वाढतील. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे जाणकारांचे मत आहे.
ग्रामस्थांची मागणी – 'कामे जलद पूर्ण करा!'
काम सुरू असले तरी काही गावांत अजून कामांची गती मंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : पडत्या भावाचा फटका; बाजारात सोयाबीनच्या आवकेत घट वाचा सविस्तर