Lokmat Agro >शेतशिवार > शेतातला रस्ता अडवलाय, का शेतात जायला रस्ताच नाही, तर केवळ एका अर्जाद्वारे मिळवा रस्ता

शेतातला रस्ता अडवलाय, का शेतात जायला रस्ताच नाही, तर केवळ एका अर्जाद्वारे मिळवा रस्ता

Latest news Shet rasta farm road is blocked by another farmer how to solve this issue | शेतातला रस्ता अडवलाय, का शेतात जायला रस्ताच नाही, तर केवळ एका अर्जाद्वारे मिळवा रस्ता

शेतातला रस्ता अडवलाय, का शेतात जायला रस्ताच नाही, तर केवळ एका अर्जाद्वारे मिळवा रस्ता

Shet Rasta : तुमच्या शेतात जाणारा रस्ता हा दुसऱ्याच्या शेतातून जातो. अशावेळी त्या शेतकऱ्याने रस्ता अडवला आहे का?

Shet Rasta : तुमच्या शेतात जाणारा रस्ता हा दुसऱ्याच्या शेतातून जातो. अशावेळी त्या शेतकऱ्याने रस्ता अडवला आहे का?

शेअर :

Join us
Join usNext

Shet Rasta :    तुमच्या शेतात जाणारा रस्ता हा दुसऱ्याच्या शेतातून जातो. अशावेळी त्या शेतकऱ्याने रस्ता अडवला आहे का? किंवा तुमच्या शेतात जायला रस्ता नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या शेतातून जात आहात का? याबाबत संबंधित शेतकरी हरकत घेत आहेत का? तर थांबा काळजी करू नका, यावर एक कायदेशीर मार्ग आहे. 

जर तुमच्या शेतात जाणारा रस्ता जर दुसऱ्याच्या शेतातून जातो. आणि त्याने जर का तो रस्ता अडवला असेल, अशावेळी तुम्ही मामलेदार न्यायालय अधिनियम १०६ च्या नुसार कलम ५ नुसार तहसीलदारांकडे अर्ज करू शकतात. या अर्जानंतर तहसीलदार काही प्रक्रिया पार करून रस्ता मोकळा करून देऊ शकतात.  

पण जर का तुमच्या शेतात जायला रस्ताच नसेल, तर अशावेळी तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ नुसार तहसीलदारांकडे अर्ज करू शकतात. आणि ते रस्ता आणि तुमची जमीन यामध्ये जेवढ्या पण जमिनी आहेत, त्यांच्या बांधावरून जाण्यासाठी तुम्हाला रस्ता करून देतील.

काय आहे कलम १४३ 
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम १४३ मध्ये शेतजमिनीच्या सीमा निश्चित करणे आणि शेत रस्त्यासाठी तरतूद आहे. या कलमाखाली, तहसीलदार इतर सर्व्हे नंबरच्या हद्दीवरील जमिनीच्या मालकांच्या दाव्यांची चौकशी करून निर्णय घेऊ शकतात. जर एखाद्या जमिनीच्या सीमा निश्चित नसल्यास, किंवा वाद असल्यास, तहसीलदार निर्णय घेऊ शकतात. 
 

Web Title: Latest news Shet rasta farm road is blocked by another farmer how to solve this issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.