Lokmat Agro >शेतशिवार > कांदा दराबाबत ठोस निर्णय घ्या, शेतकऱ्यांकडून ग्रामसभांमध्ये मागणी, ठरावही मंजूर 

कांदा दराबाबत ठोस निर्णय घ्या, शेतकऱ्यांकडून ग्रामसभांमध्ये मागणी, ठरावही मंजूर 

Latest News Resolution in Gram Sabhas to get fixed price for onion see details | कांदा दराबाबत ठोस निर्णय घ्या, शेतकऱ्यांकडून ग्रामसभांमध्ये मागणी, ठरावही मंजूर 

कांदा दराबाबत ठोस निर्णय घ्या, शेतकऱ्यांकडून ग्रामसभांमध्ये मागणी, ठरावही मंजूर 

Kanda Market Issue : गेल्या पाच महिन्यापासून कांद्याचे दर कमालीचे घसरले आहेत. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप आहे.

Kanda Market Issue : गेल्या पाच महिन्यापासून कांद्याचे दर कमालीचे घसरले आहेत. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Nashik Kanda Issue : एकीकडे कांद्याचे घसरले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश दिसू लागला आहे. अशा परिस्थितीत वेगवगेळ्या माध्यमातून आंदोलने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामसभेतही अशा पद्धतीचा ठराव केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतमध्ये हे चित्र दिसून आले. 

गेल्या पाच महिन्यापासून कांद्याचे दर कमालीचे घसरले आहेत. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप आहे. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेकडून फोन कॉल आंदोलन देखील सुरु आहे. दुसरीकडे गावागावातील शेतकरी ग्रामसभेत कांद्याला अपेक्षित दर मिळावा यासाठी ठराव करीत आहेत. जिल्ह्यातील येवला, बागलाण, निफाड आदी जिल्ह्यात ही मोहीम करण्यात आली. 

ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार आतापर्यंत स्वस्त दरात विक्री झालेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला १५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे व आता शेतकऱ्यांच्या चाळीतील कांद्याला किमान ३००० पेक्षा अधिकचा दर मिळावा, अशा मागण्या करण्यात आल्या. यामध्ये सत्यगाव, सोमठाणदेश आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सर्व ग्रामस्थांच्या व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वरील ठराव बहुमताने ग्रामसभांमध्ये मंजूर करण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या 

तसेच कांद्याची हमीभावाने खरेदी करावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आली, सध्यपरिस्थितीमध्ये कांद्याचे भाव पुर्णपणे कोसळले आहेत. परिणामी ज्या कांद्याला २५ किलोपेक्षा जास्त उत्पादन खर्च येतो, तो कांदा आज सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळे नाममात्र १० रुपये किलोने विकला जात आहे. शेतकन्याना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. सरकारने १५०० रुपये प्रति क्विंटल दराने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी भागणी शेतकऱ्यांमार्फत केली जात आहे.

Web Title: Latest News Resolution in Gram Sabhas to get fixed price for onion see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.