Ranbhaji : महाराष्ट्र शासन-कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेति) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ०३ ऑगस्ट २०२५ वार-रविवार रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्र उद्घाटन सोहळा रामेति आवारात आयोजित करण्यात आला होता.
मानवी आरोग्यामध्ये सकस रानभाज्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यात विविध भाज्यांचा समावेश असतो. जंगल आणि शेतशिवारात नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानपालेभाज्या, फळभाज्या, कंद, शेंगा यांच्यामध्ये शरीरास आवश्यक असलेले अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्याने त्यावर किटकनाशके, बुरशीनाशके यांची फवारणी करण्यात येत नाही. अशा खाद्य संपत्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.
त्यांचे आरोग्यविषयक महत्व आणि माहीती शहरी भागातील नागरीकांना व्हावी. तसेच विक्री व्यवस्था करुन आदिवासी शेतकरी बांधवांना आर्थिक फायदा व्हावा व याची जनजागृती करण्यासाठी रानभाजी महोत्सव आयोजीत करण्यात आला होता. जुन, जुलैच्या पावसाबरोबर सुरु झालेला रानभाज्यांचा हंगाम ऑक्टोबर पर्यंत चालतो. रानभाज्या औषधी गुणधर्माने परिपुर्ण असल्याने त्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
पावसाळयातील रानभाज्यामधे आंबाडी, आघाडा, अळू, अंबाडी, गुळवेल, चंदनबटवा, टाकला, टेकोळे, रानमेथी, भोकर, माठ, शेवगा, कळलावी, कळथी, चाकवत, चवळी, घोळ, करटोली, कळलावी, कळथी, कळवण, कळंबी, कातळ, कौल, कोंबडा, कोथमीर, खटा, गवार, चांग, चांगरी, चाकवत, चिंच, चिवळ, चोलाई, जांभूळ, टेंभू, तोंडली, दूर्वा, पिठवण, बोर, भोपळा, भारंगी, भेंडी, भोकर, माठ, यांचा समावेश होतो.
मानवी आहारातील रानभाज्यांचे असलेले अनन्यसाधारण महत्व आणि रानभाज्या बनविण्याच्या पद्धती याबाबत मंत्री नरहरी झिरवाळ (मा.मंत्री, अन्न व प्रशासन, विशेष सहाय्य, महाराष्ट्र राज्य) यांनी मार्गदर्शन केले तसेच रोजच्या आहारात रानभाज्यांचा वापर केला पाहिजे असेही मत त्यांनी मांडले.
मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले कि, तालुका स्तरावर देखील शेतकरी, शेतकरी महिला व पुरुष गट यांच्यासाठी कृषि विभाग व इतर संबंधित विभागांनी थेट विक्रीकरिता जागा व दालने उपलब्ध करून द्यावीत आणि नियमित विक्री सुरू ठेवावी असे सांगितले.
मंत्री दादा भुसे यांनी विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित उत्पादन घेऊन थेट ग्राहकांपर्यंत चांगल्या प्रतीचा, दर्जेदार शेतमाल चांगल्या भावात विकला कसा जाईल, यासाठी प्रयत्न करावेत तसेच रानभाज्या बनविण्याच्या रेसिपी बद्दलही शहरी ग्राहकांना मार्गदर्शन करावे असे नमुद केले.
Ranbhajya : नऊ आजारांवर एकच उपाय गुळवेल, गुळवेलचा काढा अन् भाजी कशी बनवायची?