PM Kisan Scheme : देशभरातील ९ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हफ्ता दिला जातो. तर दरवेळी अनेक शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला जातो. कारण आता पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे.
जर तुम्ही शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल, तर शेतकरी नोंदणी म्हणजे काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी ओळख क्रमांक (ID) तयार केला जातो. यानंतर, शेतकऱ्याची ओळख आणि जमिनीची सर्व माहिती शासन पोर्टलवर नोंदवली जाते, ज्यामुळे त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येतो.
शेतकरी नोंदणी का आवश्यक आहे?
या उपक्रमाचा उद्देश असा कि देशातील सर्व शेतकऱ्यांना एक ओळख मिळावी. या आयडीमुळे बियाणे, खते आणि इतर सरकारी योजनांसह अनेक लाभ मिळतील. या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, जेणेकरून त्या भागातील केवळ पात्र शेतकऱ्यांनाच सरकारी मदतीचा लाभ घेता येईल. सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहनही केले आहे.
कोणते फायदे मिळतील?
- सर्वप्रथम पीएम किसान हफ्ता मिळण्यास मदत होईल.
- शेतकऱ्यांना सरकारी योजनांमधून थेट लाभ मिळतील.
- शेतीसाठी सुलभ आणि परवडणारी कृषी कर्जे.
- शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके आणि शेतीची उपकरणे यांसारख्या कृषी निविष्ठांवर अनुदान मिळेल.
- तसेच इतर प्रत्येक शेतकरी योजनेचे लाभ मिळतील.
शेतकऱ्याची नोंदणी कशी करावी?
जर तुम्ही शेतकऱ्याची नोंदणी करत असाल, तर तुमचे आधार कार्ड, तुमच्या जमिनीच्या नोंदींची (खतौनी) झेरॉक्स यांसारखी आवश्यक कागदपत्रे सोबत असू द्या. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्ही https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन शेतकरी नोंदणीसाठी यशस्वीपणे अर्ज करू शकता.
