PM Kisan Scheme : पंतप्रधान किसान योजनेचा २१ वा हप्ता आज १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे.
तुमची ई केवायसी पूर्ण असल्यास हफ्ता मिळण्यास अडचण येणार नाही, मात्र केवायसी पूर्ण नसल्यास हफ्ता येणार नाही. तर पुढील काही स्टेपच्या माध्यमातून तुम्ही पैसे आले का नाही, हे पाहू शकता. शिवाय केवायसी कशी करायची हे देखील समजून घेता येईल.
पीएम किसानचे पैसे आले का नाही, हे कसं तपासायचं?
तुमची स्टेटस तपासण्यासाठी या पायऱ्या फॉलो करा:
- सर्वात आधी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जा. वेबसाईटची लिंक - pmkisan.gov.in
- या ठिकाणी एक होमपेज ओपन होईल. येथील फार्मर्स कॉर्नर यावर क्लिक करा.
- त्यांनतर Status of Self-Registered Farmer/CSC Farmers” वर क्लिक करा
- तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून तुमची माहिती पहा आणि तपासा.
लाभार्थी यादी कशी पहावी?
- याच वेबसाईटवर फार्मर्स कॉर्नर या पर्यायावर क्लिक करा.
- यातील लाभार्थी यादी (Beneficiary List) निवडा.
- राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव निवडा
- पुढील “माहिती मिळवा” यावर क्लिक करा.
तुमची ईकेवायसी बाकी असल्यास पुढील स्टेप वापरून पूर्ण करा...
शेतकरी त्यांच्या मोबाइलवरून फेस ऑथेंटिकेशन वापरून सहजपणे ईकेवायसी करू शकतात :
- पायरी १ : गुगल प्ले स्टोअरवरून पीएम-किसान मोबाइल अँप आणि आधार फेस आरडी अँप डाउनलोड करा.
- पायरी २ : अँप उघडा आणि तुमच्या पीएम-किसान नोंदणीकृत मोबाइल नंबरने लॉग इन करा.
- पायरी ३ : “लाभार्थी स्थिती” (Beneficiary Status) वर जा.
- पायरी ४ : जर ईकेवायसी “नाही” दिसत असेल, तर ईकेवायसी वर क्लिक करा, तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि फेस स्कॅनला परवानगी द्या.
- पायरी ५ : यशस्वी फेस स्कॅननंतर, ईकेवायसी पूर्ण झाले असे मानले जाईल.
