Chief Minister's Fellowship Scheme : सन २०२५-२६ या कालावधीपासून राज्यात "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" राबविण्यात येत आहे. राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता, यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांनी मिळावा यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२६-२७ ची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यंदाच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने फेलोंच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती निश्चित करण्याच्या दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्याच्या दृष्टीने शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
(अ) कार्यक्रमाची अंमलबजावणी :
या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अधिनस्त अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत करण्यात यावी.
(ब) फेलोंच्या निवडी संबंधातील निकष :
(१) अर्जदार भारताचा नागरिक असावा.
(२) शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६०% गुण आवश्यक) असावा.
(३) अनुभव : किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप /आर्टीकलशिपसह एक वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.
विद्यावेतन (छात्रवृत्ती) :
सदर कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये ५६ हजार १०० रुपये, प्रवास खर्च रुपये ५ हजार ४०० रुपये असे एकत्रित रुपये ६१ हजार ५०० रुपये छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.
अतिशय महत्वाचे :
तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करावा आणि इतर अटी काय आहेत, यासाठी राज्य शासनाने निर्गमित केलेला शासन निर्णय पाहावा.
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
