नाशिक : विंचूर येथील शेतकरीपुत्र डॉ. संकेत शेखर महाजन शेतकरीपुत्राने भातशेतीतील कीड नियंत्रणावर महत्त्वपूर्ण असे संशोधन केले असून, त्यांच्या एकात्मिक कीटक व्यवस्थापन मॉड्यूलमुळे या शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.
महाजन यांना भातशेतीवरील सखोल संशोधनाबद्दल सॅम हिग्गीन बॉटम कृषी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज येथून नुकतीच पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांनी 'सिंथेसिस अँड डेव्हलपमेन्ट ऑफ प्लान्ट प्रोटेक्शन मॉड्यूल फॉर देअर इफेक्टिव्हनेस अगेन्स्ट इनसेक्ट पेस्ट कॉम्प्लेस ऑफ प्याडी अंडर सेंट्रल प्लेन अॅग्रो क्लायमेटीक झोन ऑफ उत्तर प्रदेश' असा होता.
डॉ. महाजन यांनी भात शेतीत एकात्मिक कीटक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी बीजप्रक्रिया ते काढणीपर्यंत विविध वनस्पती संरक्षण मॉड्यूलची निर्मिती केली. भारतातील भात हे प्रमुख अन्नधान्य असून देशाच्या अन्नसुरक्षेचा पाया या पिकावर आहे. परंतु गेल्या काही वर्षात बदलत्या हवामानामुळे व वाढत्या कीड-रोग प्रादुर्भावामुळे भात उत्पादनावर गंभीर संकट उभे राहिले आहे.
बासमती व बहुगुणकारी काला नमक या जातींना होणाऱ्या कीड प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत होते. ही समस्या लक्षात घेऊन व चाचणी केली. सलग दोन वर्षे उत्तर प्रदेशातील मध्य मैदानी प्रक्षेत्रात प्रयोगात्मक प्रात्यक्षिके घेऊन या मॉड्यूलची कार्यक्षमता सिद्ध करण्यात आली.
संशोधनामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होणार आहे. प्रा. डॉ. अश्विनी कुमार, डॉ. अनुराग तायडे, प्रा. डॉ. सुनिल झकारिया, प्रा. डॉ. अजित पॉल यांचे मार्गदर्शन लाभले.
हवामान बदलानुसार कीटकांचा अंदाज, भात पिकातील मित्र कीटकांचा अभ्यास, जैविक नियंत्रण उपाययोजनांचे मूल्यांकन, तसेच शेतकरी-अनुकूल वनस्पती संरक्षण तंत्रज्ञान यावर विशेष भर दिला. त्यातून विकसित झालेले मॉड्यूल शेतकऱ्यांसाठी परिणामकारक ठरेल.
- डॉ. संकेत महाजन