Lokmat Agro >शेतशिवार > Onion Export Duty : लाल कांद्यात घसरण, 20 टक्के निर्यातशुल्क कमी करण्याची मागणी, वाचा सविस्तर 

Onion Export Duty : लाल कांद्यात घसरण, 20 टक्के निर्यातशुल्क कमी करण्याची मागणी, वाचा सविस्तर 

Latest News Onion Export Duty red onion market down demand for 20 percent reduction in export duty, read in detail | Onion Export Duty : लाल कांद्यात घसरण, 20 टक्के निर्यातशुल्क कमी करण्याची मागणी, वाचा सविस्तर 

Onion Export Duty : लाल कांद्यात घसरण, 20 टक्के निर्यातशुल्क कमी करण्याची मागणी, वाचा सविस्तर 

Onion Export Duty : खरीप हंगामातील रांगडा कांद्याची विक्री नुकतीच सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

Onion Export Duty : खरीप हंगामातील रांगडा कांद्याची विक्री नुकतीच सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : जिल्ह्यात कांद्याच्या भावात (Kanda Market) दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून, खरीप हंगामातील रांगडा कांद्याची विक्री नुकतीच सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील आठवड्यात कांद्याला सरासरी (Kanda Bajarbhav) चार हजार रुपये भाव मिळत असलेला दर आता दोन हजार रुपयांवर आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. 

चारच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये साडेतीन ते चार हजारांवर स्थिर असलेल्या लाल कांद्याचे दर (Red Onion Market) कमी झाले. सटाणा, लासलगाव चांदवड, उमराणे, देवळा येथील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या (Kanda Market) भावात सुधारणा होत असतानाच जवळपास दोन हजारांनी भाव कमी झाले. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याचा प्रश्न आता केंद्र सरकारपर्यंत पोहोचला आहे. खासदार भास्कर भगरे यांनी संसदेत हा प्रश्न उपस्थित केला, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कांदा निर्यातदार संघटनेच्या वतीने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. 

केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातवरती 20 टक्के निर्यात शुल्क आकारले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज कांद्याच्या दरात घसरण होत असून आता शेतकऱ्यांना कांद्याला सरासरी 1800 ते 2000 प्रतिक्विंटल इतका कमी दर मिळत आहे. त्यामुळे कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तत्काळ हटवून ते शून्य करावे,अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाठ्वण्यात आले आहे. 

20 टक्के निर्यातशुल्क कमी केल्यास

आता झालेल्या कांदा दर घसरणीमुळे प्रत्येक शेतकऱ्याचे सरासरी प्रतिक्विंटल दीड हजार रुपये प्रमाणे नुकसान होत असून आधीच परतीच्या पावसामुळे व बेमोसमी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने प्रति एकर उत्पादन घटले आहेत. त्यातच आता दरघसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे कांद्याच्या निर्यातीवर आकारले जाणारे 20 टक्के निर्यातशुल्क तत्काळ कमी केल्यास कांदा निर्यातीचे प्रमाण वाढून कांद्याच्या दरात पुन्हा सुधारणा होण्याची संधी आहे त्यातून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसानही थांबेल व कांद्याचे बाजार भाव स्थिर होतील. 

Kanda Market Update : लाल कांदा घसरला, नाशिक, सोलापूर बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर

Web Title: Latest News Onion Export Duty red onion market down demand for 20 percent reduction in export duty, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.