Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Pm Kisan Scheme : पीएम किसानचा पुढचा हफ्ता 'या' तारखेला मिळणार, पण तुम्ही दोन हजार रुपये विसरा!

Pm Kisan Scheme : पीएम किसानचा पुढचा हफ्ता 'या' तारखेला मिळणार, पण तुम्ही दोन हजार रुपये विसरा!

Latest news next 22th installment of PM Kisan scheme will be available holi festival | Pm Kisan Scheme : पीएम किसानचा पुढचा हफ्ता 'या' तारखेला मिळणार, पण तुम्ही दोन हजार रुपये विसरा!

Pm Kisan Scheme : पीएम किसानचा पुढचा हफ्ता 'या' तारखेला मिळणार, पण तुम्ही दोन हजार रुपये विसरा!

Pm Kisan Scheme : मागील २१ वा हफ्ता नोव्हेंबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानुसार पुढील हफ्ता या दिवशी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Pm Kisan Scheme : मागील २१ वा हफ्ता नोव्हेंबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानुसार पुढील हफ्ता या दिवशी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Pm Kisan Scheme :    देशभरातील शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत २२ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, होळीपूर्वी बँक खात्यात २००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मागील २१ वा हफ्ता नोव्हेंबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानुसार पुढील हफ्ता कधी मिळणार, याबाबतची माहिती समोर आली आहे. 

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये म्हणजेच प्रत्येकी २ हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये मिळतात. जे थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २१ हफ्ते वितरित करण्यात आले आहेत, आता चार महिने होत आले आहेत, त्यानुसार होळीपर्यंत किंवा होळीच्या दोन तीन दिवस मागे पुढे २२ वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

एकीकडे शेतकरी २२ व्या हफ्त्याची वाट पाहत आहेत, दुसरीकडे शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, ज्यांच्याकडे आयडी नाही, त्यांना पीएम-किसानचे २ हजार रुपये मिळणार नाहीत. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की ज्यांची नावे लाभार्थी यादीत नाहीत, त्यांना पीएम किसानचे पैसे मिळणार नाहीत.

केवायसी करून ठेवा 
विलंब टाळण्यासाठी, लाभार्थ्यांनी त्यांचे आधार त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले आहे, त्यांचे ई-केवायसी पूर्ण आहे, त्यांच्या बँक खात्याचे तपशील बरोबर आहेत आणि त्यांच्या जमिनीच्या नोंदी योग्यरित्या अपडेट केल्या आहेत याची खात्री करावी. लक्षात ठेवा की अपूर्ण आधार सीडिंग किंवा प्रलंबित ई-केवायसीमुळे पेमेंटमध्ये विलंब होऊ शकतो. म्हणून, केवायसीकडे बारकाईने लक्ष द्या.

लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे?

  • अधिकृत पीएम-किसान पोर्टल pmkisan.gov.in वर जा
  • होमपेजवरील "लाभार्थी यादी" पर्यायावर क्लिक करा.
  • राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
  • अहवाल मिळवा" वर क्लिक करा.
  • पोर्टल गावानुसार लाभार्थ्यांची यादी प्रदर्शित करेल. 
  • शेतकऱ्यांनी तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे किंवा नाही, हे पाहावे. 

Web Title : पीएम किसान की अगली किस्त जल्द; आईडी अनिवार्य, केवाईसी जरूरी!

Web Summary : किसानों को पीएम किसान योजना की 22वीं किस्त का इंतजार है, जो होली के आसपास मिलने की उम्मीद है। किसान आईडी अनिवार्य; भुगतान में देरी से बचने के लिए केवाईसी पूरा करना और भूमि रिकॉर्ड सही होना जरूरी है। pmkisan.gov.in पर लाभार्थी सूची जांचें।

Web Title : PM Kisan next installment date nears; ID mandatory, KYC important!

Web Summary : Farmers await the PM Kisan scheme's 22nd installment, expected near Holi. Farmer ID is now mandatory; KYC completion and accurate land records are crucial to avoid payment delays. Check the beneficiary list on pmkisan.gov.in.