नाशिक : नाफेड अंतर्गत कांदा खरेदी केंद्र (Nafed Kanda Kharedi) म्हणून नोंदणीकृत बाळासाहेब ठाकरे अटल नावीण्यपूर्ण सहकारी संस्था मर्या. नाशिक या संस्थेवर अवसायक नेमण्यात आले असतानाही त्या संस्थेने कांदा खरेदी विक्री सुरू ठेवल्याने नियमाचा भंग झाल्याप्रकरणी संस्थेला जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलानी यांनी नोटीस बजावली आहे.
नाफेड अंतर्गत कांदा खरेदी (NAFED) केंद्र म्हणून बाळासाहेब ठाकरे अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्था मर्या. नाशिक (Nashik Kanda Market) ही सहकारी संस्था नोंदणीकृत असून सदर संस्थेचे कांदा खरेदी केंद्र गोडावून निफाड तालुक्यातील पिंपळगांव ब., ता. निफाड, जि.नाशिक येथे आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ अन्वये नोंदविण्यात आलेली असून सदरची संस्था या कार्यालयाचे कार्यकक्षेत येते.
सदर संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील तरतुदी, संस्थेच्या एंजूर उपविधीमधील तरतुदीनुसार संस्थेचे दैनंदिन कामकाज करणे सर्व संबंधितांवर बंधनकारक आहे. सदरचे कामकाज संस्थेने पार न पाडल्यामुळे या कार्यालयाने अवसायनाचा अंतरीम आदेश निर्गमित केलेला असून संस्थेवर सहकार अधिकारी वैशाली आव्हाड यांची नियुक्ती केलेली आहे. याबाबतची प्रत जिल्हाधिकारी व पणन संचालक यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.
नाफेडची कांदा खरेदी
नाफेडची कांदा खरेदी आज ५ ऑगस्टपर्यंत असल्याचे नाशिकच्या अधिकाऱ्यांकडून समजते आहे. आतापर्यंत किती खरेदी याबाबत देखील अनभिज्ञता आहे. शिवाय दरही कमी आहेत. दुसरीकडे बाजारात दर कमी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नाफेडकडून अपेक्षा होती, मात्र यातही अनियमतता दिसून येत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
Kanda Market : आज सोमवारी राज्यातील बाजारात कांदा बाजार भाव असे आहेत, वाचा सविस्तर