Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Mukhyamantri Shashwat Sinchan Yojana : शेततळ्यासाठी ७५ हजारांची मदत; 'या' शेतकऱ्यांची यादी जाहीर, वाचा सविस्तर

Mukhyamantri Shashwat Sinchan Yojana : शेततळ्यासाठी ७५ हजारांची मदत; 'या' शेतकऱ्यांची यादी जाहीर, वाचा सविस्तर

latest news Mukhyamantri Shashwat Sinchan Yojana: 75 thousand rupees assistance for farm ponds; List of 'these' farmers announced, read in detail | Mukhyamantri Shashwat Sinchan Yojana : शेततळ्यासाठी ७५ हजारांची मदत; 'या' शेतकऱ्यांची यादी जाहीर, वाचा सविस्तर

Mukhyamantri Shashwat Sinchan Yojana : शेततळ्यासाठी ७५ हजारांची मदत; 'या' शेतकऱ्यांची यादी जाहीर, वाचा सविस्तर

Mukhyamantri Shashwat Sinchan Yojana : अनियमित पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. 'मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळे योजने'अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी ७५ हजार रुपये अनुदान मंजूर झाले असून लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. संरक्षित सिंचनाच्या दृष्टीने ही योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. (Mukhyamantri Shashwat Sinchan Yojana)

Mukhyamantri Shashwat Sinchan Yojana : अनियमित पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. 'मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळे योजने'अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी ७५ हजार रुपये अनुदान मंजूर झाले असून लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. संरक्षित सिंचनाच्या दृष्टीने ही योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. (Mukhyamantri Shashwat Sinchan Yojana)

जब्बार चिनी

अनियमित पावसामुळे शेतीपुढे उभ्या राहिलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारी 'मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळे योजना' शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे. (Mukhyamantri Shashwat Sinchan Yojana)

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ७५ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले असून, वणी तालुक्यात लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

संरक्षित सिंचनासाठी प्रभावी पाऊल

खरीप हंगामात पावसात खंड पडल्यास पिकांना मोठा फटका बसतो. अशा परिस्थितीत शेततळ्यात साठवलेले पाणी पिकांच्या ओलितासाठी वापरता येते. त्यामुळे संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊन उत्पादनात स्थैर्य येते. 

शासनाने सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे, उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने ही योजना गतीने राबविली आहे.

वणीत किती लाभार्थी?

वणी तालुक्यातील ५३ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले असून त्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान वितरित केले जात आहे.

किती मिळणार अनुदान?

या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला ७५,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम शेततळे खोदकाम आणि संबंधित कामांसाठी वापरता येते.

अर्ज प्रक्रिया कशी?

शेतकऱ्यांनी महाडीबीटी(MahaDBT) पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक

लॉटरी पद्धतीने किंवा पात्रतेनुसार लाभार्थी निवड

कृषी विभागाकडून पूर्वसंमती मिळाल्यानंतरच कामास सुरुवात

काम पूर्ण झाल्यानंतर जिओ-टॅगिंगद्वारे पडताळणी

या प्रक्रियेनंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.

शेतकऱ्यांना आवाहन

शेततळे हा दुष्काळ आणि अनियमित पावसावर प्रभावी उपाय आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.- दिलीप राऊत, तालुका कृषी अधिकारी

शेततळ्यांमुळे पिकांना आवश्यक वेळी पाणीपुरवठा होऊन उत्पादनात वाढ होते आणि शेतीला दीर्घकालीन स्थैर्य मिळते. त्यामुळे शाश्वत शेतीच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची मानली जात आहे.

अनियमित पावसाच्या संकटावर मात करत शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना तालुक्यात सकारात्मक प्रतिसाद मिळवत आहे. आगामी काळात अधिकाधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे ही वाचा सविस्तर: Sugarcane Harvester Scheme : ऊस हार्वेस्टरवर मिळणार सबसिडी; केंद्राची हार्वेस्टर अनुदान योजना चर्चेत

Web Title : महाराष्ट्र सिंचाई योजना: खेत तालाबों के लिए ₹75,000 की सब्सिडी

Web Summary : महाराष्ट्र की शाश्वत सिंचाई योजना अनियमित वर्षा का सामना कर रहे किसानों की मदद के लिए खेत तालाबों के लिए ₹75,000 प्रदान करती है। वानी में 53 किसानों को खुदाई के लिए धन मिला, जिससे स्थिर सिंचाई और बढ़ी हुई उपज को बढ़ावा मिला। महाडीबीटी पोर्टल के माध्यम से ऑनलाइन पंजीकरण आवश्यक है।

Web Title : Maharashtra Offers ₹75,000 Subsidy for Farm Ponds under Irrigation Scheme

Web Summary : Maharashtra's Shashwat Sinchan Yojana provides ₹75,000 for farm ponds, aiding farmers facing irregular rainfall. 53 farmers in Wani receive funds for digging, promoting stable irrigation and increased yields. Online registration via MahaDBT portal is a must.