Mofat Chara Biyane : रब्बी हंगाम २०२५-२६ साठी पशुपालकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे. दुभत्या जनावरांसाठी पौष्टिक व दर्जेदार खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे सुधारित संकरित चारा बियाणे १०० टक्के अनुदानावर मोफत वाटप केले जाणार आहे. (Mofat Chara Biyane)
लातूर जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यांमधील पात्र शेतकरी व पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.(Mofat Chara Biyane)
अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२५ निश्चित करण्यात आली असून, त्यानंतर प्राप्त झालेले किंवा अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, अशी स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी दिली आहे.(Mofat Chara Biyane)
योजनेची वैशिष्ट्ये काय?
१०० टक्के अनुदानावर सुधारित संकरित चारा बियाणे उपलब्ध
अर्जाची अंतिम तारीख : १५ ऑक्टोबर २०२५
अर्ज सादरीकरणाचे ठिकाण : नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना
अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रे पंचायत समिती व दवाखान्यात उपलब्ध
लाभार्थी निवड सोडत पद्धतीने
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने (Lottery system) केली जाणार आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी वेळेत पूर्ण कागदपत्रांसह अर्ज दाखल करावा, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
योजनेचे पात्रता निकष काय आहेत?
अर्जदाराकडे भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीकृत किमान ३ ते ४ दुभती जनावरे असणे आवश्यक.
चारा उत्पादनासाठी स्वतः ची शेतजमीन व सिंचनाची सुविधा असावी.
सर्व प्रवर्गातील पशुपालकांना अर्ज करण्याची परवानगी.
लातूर जिल्ह्यातील प्रत्येक पात्र पशुपालकाने वेळेत अर्ज करून या १०० टक्के अनुदानित चारा बियाणे योजनेचा लाभ घ्यावा. ही योजना दुभत्या जनावरांच्या पोषणासाठी आणि पशुधन विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
जिल्हा पशुसंवर्धन १०० टक्के अनुदानावर संकरीत चारा , बियाणे होणार उपलब्ध.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांना या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.