Medicinal Cultivation Scheme : शेतकऱ्यांसाठी औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीचा नवा मार्ग खुला झाला आहे. केंद्र सरकारने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राज्याला ४.४० कोटींचं लक्षांक मंजूर केले आहे.(Medicinal Cultivation Scheme)
या नव्या योजनेतून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार ते १.५० लाख रुपयांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार आहे. बंद झालेली औषधी लागवड योजना नव्या स्वरूपात पुन्हा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.(Medicinal Cultivation Scheme)
राज्यातील शेतकऱ्यांसाठी औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीसाठी केंद्र सरकारने मोठी आर्थिक तरतूद जाहीर केली आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राज्याला ४.४० कोटी रुपयांचे लक्षांक मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे या नव्या उपक्रमाचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेतीत नवा आर्थिक पर्याय शोधू शकतील.(Medicinal Cultivation Scheme)
नवीन घटकाची सुरुवात
केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा नवीन घटक २०२५-२६ च्या वार्षिक कृती आराखड्यात समाविष्ट केला आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार ते १.५० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, अर्ज सुरू होण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे इच्छुक शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
बंद झालेली योजना पुन्हा सुरू
२०१५-१६ पासून राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती लागवड योजना सुरू होती. मात्र, २०२१-२२ मध्ये ही योजना बंद करण्यात आली व हा घटक आयुष मंत्रालयाकडून कृषी मंत्रालयाकडे हस्तांतरित झाला. आता कृषी मंत्रालयाने नव्या स्वरूपात ही योजना पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
मनरेगा अंतर्गतही लाभ
औषधी वनस्पती लागवडीसाठी आणखी एका पर्यायाची भर पडली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) खासगी मालकीच्या शेतातही औषधी वनस्पती लागवड करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत सलग क्षेत्र, बांधावर किंवा पडीक जमिनीत ‘अमृत महोत्सवी वृक्ष लागवड कार्यक्रम’ राबवला जाणार आहे.
या औषधी प्रजातींना अनुदान
या योजनेंतर्गत पुढील १६ औषधी वृक्ष प्रजातींना अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात यासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
औषधी-सुगंधी वनस्पती लागवडीच्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांबरोबरच एक नवा आणि नफ्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मनरेगा आणि फलोत्पादन अभियानाचा लाभ घ्यावा व उत्पन्नात वाढ साधावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
औषधी व सुगंधी वनस्पती लागवड करू इच्छिणाऱ्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. - मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा