Lokmat Agro >शेतशिवार > Marathwada Crop Damage : मराठवाड्यात अतिवृष्टीचा तडाखा; १७ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Marathwada Crop Damage : मराठवाड्यात अतिवृष्टीचा तडाखा; १७ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

latest news Marathwada Crop Damage: Heavy rains hit Marathwada; Crop damage on 17 lakh hectares Read in detail | Marathwada Crop Damage : मराठवाड्यात अतिवृष्टीचा तडाखा; १७ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Marathwada Crop Damage : मराठवाड्यात अतिवृष्टीचा तडाखा; १७ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Marathwada Crop Damage : मुसळधार पावसाने मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः उघडे पडले आहेत. संपूर्ण मराठवाड्यातील पिकांचे नुकसान तब्बल १७ लाख हेक्टरवर गेले आहे. वाचा सविस्तर (Marathwada Crop Damage)

Marathwada Crop Damage : मुसळधार पावसाने मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः उघडे पडले आहेत. संपूर्ण मराठवाड्यातील पिकांचे नुकसान तब्बल १७ लाख हेक्टरवर गेले आहे. वाचा सविस्तर (Marathwada Crop Damage)

शेअर :

Join us
Join usNext

Marathwada Crop Damage : मुसळधार पावसाने मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः उघडे पडले आहेत. संपूर्ण मराठवाड्यातील पिकांचे नुकसान तब्बल १७ लाख हेक्टरवर गेले आहे. (Marathwada Crop Damage)   

पैठण तालुक्यातील ढगफुटीने सर्वाधिक फटका बसला असून पंचनाम्यांचा वेग फक्त सहा टक्क्यांवरच अडकला आहे. तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.(Marathwada Crop Damage)  

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे १ लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, तब्बल दीड लाख शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात आले आहे. यावर्षी मे महिन्यातील अवकाळीनंतर खरीप हंगामातही ढगफुटीसारख्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या आहेत.(Marathwada Crop Damage)  

पैठण तालुक्याला सर्वाधिक फटका

गत आठवड्यात झालेल्या ढगफुटीने पैठण तालुक्यातील १२२ गावांतील ७८,५१४ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली.

सिल्लोड तालुक्यात ५४ गावांमध्ये १५,१६० हेक्टरवरील पिके पाण्याखाली

गंगापूर तालुक्यात १९ गावांतील ३,३५१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

खुलताबाद तालुक्यात ३६ गावांमध्ये ७४६ हेक्टरवरील पिकांना फटका

कन्नड तालुक्यात २८ गावांतील २६५ हेक्टरवरील पिके बाधित

सोयगाव तालुक्यात १२ गावांमध्ये सुमारे १,६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पंचनाम्यांचा वेग मंदावला

राज्य शासनाने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी सततचा पाऊस व सुट्यांमुळे महसूल आणि कृषी विभागाकडून केवळ ६% पंचनामे आजपर्यंत पूर्ण झाले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर

फक्त संभाजीनगर नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यातील पिकांचे नुकसान तब्बल १७ लाख हेक्टरवर गेले आहे. जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाने अपेक्षेपेक्षा जास्त हजेरी लावली. 

अधिकाऱ्यांची पाहणी

पैठण तालुक्यातील कातपूर शिवारात नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार विलास भुमरे ट्रॅक्टरने गेले. उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार यावेळी उपस्थित होते. सोयगाव तालुक्यात आमदार संजना जाधव यांनी पाझर तलावाच्या पाण्यातून मार्ग काढत शिवारातील पिकांची पाहणी केली.

भरपाईचे निकष

एनडीआरएफच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भरपाईचे निकष

फळबागांचे नुकसान : २२ हजार ५०० रुपये प्रती हेक्टर

बागायती पिकांचे नुकसान : १७ हजार रुपये प्रती हेक्टर

कोरडवाहू पिकांचे नुकसान : ८ हजार रुपये प्रती हेक्टर मदत मिळू शकते.

शेतकऱ्यांचा आक्रोश 

सततच्या पावसामुळे पिके, मेहनत आणि गुंतवणूक पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पंचनामे व मदतकार्याला गती देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Marathwada Crop Damage : मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या वाटेवर; १६ लाख हेक्टरवरील पिके जलमय

Web Title: latest news Marathwada Crop Damage: Heavy rains hit Marathwada; Crop damage on 17 lakh hectares Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.