Lokmat Agro >शेतशिवार > पाच महिने शेतात राबून पदरात केवळ 27 हजार रुपये, ही आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा

पाच महिने शेतात राबून पदरात केवळ 27 हजार रुपये, ही आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा

Latest News Kanda Market Farmer couple earns Rs 5 thousand 400 hundred per month from onion production | पाच महिने शेतात राबून पदरात केवळ 27 हजार रुपये, ही आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा

पाच महिने शेतात राबून पदरात केवळ 27 हजार रुपये, ही आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा

Kanda Market : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वर्ष २०२४ मध्ये अभ्यास करून वरील निष्कर्ष काढला असून तो राज्य कृषिमूल्य आयोगाला सादर केला आहे.

Kanda Market : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वर्ष २०२४ मध्ये अभ्यास करून वरील निष्कर्ष काढला असून तो राज्य कृषिमूल्य आयोगाला सादर केला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- शिवाजी पवार
अहिल्यानगर : कांद्याचा एकरी उत्पादन खर्च ९८ हजार ७५४ रुपये, तर शेतकऱ्यांना त्यातून एक लाख २६ हजार रुपये उत्पन्न मिळते. याचाच अर्थ पाच महिने शेतात कुटुंबीयांसह राबल्यानंतर त्याच्या पदरात केवळ २७ हजार रुपये नफा मिळतो.

म्हणजेच महिन्याला पाच हजार ४०० रुपये उत्पन्न मिळते. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वर्ष २०२४ मध्ये अभ्यास करून वरील निष्कर्ष काढला असून तो राज्य कृषिमूल्य आयोगाला सादर केला आहे.

कृषी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे डॉ. राजेंद्र हिले यांची राज्य सरकारने कांदा धोरण समितीवर नियुक्ती केली आहे. त्यांच्याच नेतृत्वात कांदा उत्पादन खर्चावर काम केले जाते. विद्यापीठामधील तज्ज्ञ समितीने तीन जिल्ह्यात प्रत्येकी १० शेतकऱ्यांकडे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. 

शेत तयार करण्यापासून तर बियाणे, मजुरी, खते, वीज बिल, आदींचा खर्च, खेळत्या भांडवलासह जमिनीचा भाडेपट्टा, अवजारे आणि विहिरी-बोअरवेल, पाइपलाइन यावरील व्याजदरही विचारात घेतला आहे. रोजंदारीवरील मजुरांबरोबरच शेतकरी पती व पत्नीची ४१ दिवसांची रोजंदारीही त्या हिशोबात आहे.

प्रति दिन रोजंदारी ९० रुपये
कांद्याचे रोप तयार करण्यापासून तर कांदा काढणीपर्यंत पाच महिन्यांचा अवधी लागतो या कालावधीत शेतकरी दाम्पत्याला प्रति महिना केवळ ५ हजार ४०० रुपये एवढेच उत्पन्न मिळते. म्हणजे प्रति दिन पती व पत्नीला प्रत्येकी २० रुपये रोजंदारी पडते, असा निष्कर्ष या अभ्यासातून निघाला आहे.

कांद्याचा एकरी उत्पादन खर्च

  • (रब्बी २०२३-२४) : ९८,७५४ रुपये
  • एकरी उत्पन्न : १ लाख २६ हजार २६६ रुपये
  • एकरी उत्पादन : ९.३६ टन 
  • कांद्याचा सरासरी भाव : १३४९ रुपये क्विंटल 

 

Kanda Market : 2 ऑगस्टला लासलगाव, पिंपळगाव कांदा मार्केटला आवक किती झाली, काय भाव मिळाला? 
 

Web Title: Latest News Kanda Market Farmer couple earns Rs 5 thousand 400 hundred per month from onion production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.