Lokmat Agro >शेतशिवार > Kanda Lagvad : शेतकरी घरगुती कांदा बियाणे लागवडीकडे का वळत आहेत? वाचा सविस्तर 

Kanda Lagvad : शेतकरी घरगुती कांदा बियाणे लागवडीकडे का वळत आहेत? वाचा सविस्तर 

Latest News Kanda Lagvad Why are farmers turning to home-grown cultivation onion seeds Read in detail | Kanda Lagvad : शेतकरी घरगुती कांदा बियाणे लागवडीकडे का वळत आहेत? वाचा सविस्तर 

Kanda Lagvad : शेतकरी घरगुती कांदा बियाणे लागवडीकडे का वळत आहेत? वाचा सविस्तर 

Kanda Lagvad : यंदा सर्वाधिक प्रमाणात घरीच कांदा बीज उत्पादन (Kanda Lagvad) घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

Kanda Lagvad : यंदा सर्वाधिक प्रमाणात घरीच कांदा बीज उत्पादन (Kanda Lagvad) घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- संतोष वाघ 

नाशिक :उन्हाळी कांद्याचे आगर असलेल्या कळवण तालुक्यात (Kalwan Taluka) यंदा सर्वाधिक प्रमाणात घरीच कांदा बीज उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, यंदा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रत्येक शेतकऱ्याने डोंगळ्याची लागवड (Kanda Lagvad) केली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बोगस, कांदा बीज विक्री करणाऱ्याच्या कंपन्यांना शह देण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डोंगळ्याची लागवड केली असल्याचे कांदा उत्पादक शेतक-यांनी सांगितले. 

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका व कसमादे परिसरात शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून खरिपातील लाल तर रब्बीतील रांगडा व उन्हाळी कांदा आहे. परिसरात शंभर टक्के कांदा उत्पादक शेतकरी असून कांद्याचे उत्पादन लहान मोठे शेतकरी घेत आहेत. शेतकरी गेल्या पंधरा वर्षांपासून परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतीत सर्वाधिक कांदा लागवह केलेली असून, आजच्या तरुण युवा शेतकरी बांधवांनी देखील कांदा उत्पादनावर अधिक भर दिला आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे गेल्या आठ-दहा वर्षांपासून दर्जेदार कांदा बीज निर्मिती व त्याची बाजारातील उपलब्धता ही समस्या शेतकऱ्यांना भेडसावत असून शेतकऱ्यांना बाजारात दर्जेदार कांदा बीज उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे मागील वर्षापासून तसेच यंदा देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी पारंपरिक पद्धतीने घरीच कांदा बीज उत्पादनाकडे पुन्हा वळला आहे. यामुळे कसमादे परिसरात अनेक शेतकऱ्यांनी डॉगळ्यांची लागवढ़ केली आहे. त्यातून शेतकऱ्यांना आता घरगुती बियाणे मिळणार असून भविष्यात बियाणासाठी होणारी त्यांची गैरसोय थांबणार आहे.

घरगुती बियाणांचे गुणधर्म
घरगुती कांदा बीज जमिनीत टाकल्यावर त्याचा उतार शंभर टक्के मिळतो व पाऊस आल्यास जास्त पाणी झाल्यास काही अंशी मर होते. या बिजापासून लागवड केलेला उन्हाळी कांदा चार महिन्यात काढणीस येतो व उत्पादन काहीअंशी या बिजापासून कमी मिळते.

बाजारातील बीजचे गुणधर्म
बाजारातील कांदा बीज विक्री करणाऱ्या नामांकित कंपन्यांच्या कांदा बीज जमिनीत टाकले असता त्याचा उतार हा कंपनीकडून साठ टक्के सांगण्यात येतो; मात्र भेसळ बीज असल्यामुळे बीज हे साठ टक्के उतार मिळती व पाऊस आल्यास पूर्णतः मर होते. बाजारातील बीजपासून लागवड केलेला कांदा हा फक्त तीन महिन्यांत काढणीस येतो.

सुरुवातीला १००० रुपये किलो होता दर
सात-आठ वर्षांपासून शेतकऱ्यांनी पारंपरिक कांदा बीज उत्पादन बंद केले व कंपन्यांचे कांदा बीज घेणे सुरु केले. त्यावेळेस बाजारातील कांदा बीज १००० रुपये किलो दराने मिळू लागल्याने त्याकडे शेतकऱ्याऱ्यांचा कल वाढला. यामुळे शेकडो कंपन्या बाजारात आल्या. तेव्हापासून कांदा बियाणांमध्ये भेसळ होऊन फसवणूक होऊ लागली. 

चार पटीने वाढले दर
कांदा बिजाची बाजारात प्रचंड कृत्रिम टंचाई भासवून सलग आठ वर्षांपासून चार पटीने दर वाढवून बियाणांची विक्री केली जाते. त्यात शेतकऱ्यांना पूर्णता भेसळ कांदा बीज विक्री केल्याचे सिद्ध देखील झाले असून यात शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने या आठ वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकरी नाडला गेला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी विकत घेऊन टाकलेले बियाणे शेतात उगवले नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसानीला शेतकरी वर्गाला सामोरे जावे लागले आहे.

पारंपरिक पद्धतीचा वापर
बाजारात सर्वच कंपन्या सर्रासपणे कांदा बिज्ञामध्ये भेसळ करू लागल्याने त्याचा उताराही कमी मिळतो. त्यामुळे आता आम्ही सर्व शेतकरी मोठ्या प्रमाणात घरीच पारंपरिक पद्धतीने कांदा बौज निर्मितीकडे वळलो आहोत. 
- उत्तम मोरे, कांदा उत्पादक शेतकरी, पिळकोस

Web Title: Latest News Kanda Lagvad Why are farmers turning to home-grown cultivation onion seeds Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.