Kanda Chal Anudan Yojana : महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाच्या माध्यमातून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी कांदा आणि लसूण साठवणुकीसाठी अत्याधुनिक साठवणूक गृह (Onion/Garlic Storage Structure) उभारण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य दिले जाते.
या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना कांदा व लसूण तांत्रिक पद्धतीने साठवण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आणि बाजारात योग्य वेळी व योग्य दराने पुरवठा सुनिश्चित करणे हा आहे.
ही योजना वैयक्तिक शेतकरी, महिला गट, सहकारी संस्था आणि उत्पादक संघासाठी खुली आहे, ज्यामुळे उत्पादन जास्त काळ टिकवता येईल आणि बाजारात योग्य दर मिळवता येईल.
लाभार्थी निकष काय?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
* अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतः च्या मालकीची जमीन असावी.
* त्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणे बंधनकारक आहे.
* शेतकऱ्याकडे प्रत्यक्ष कांदा पीक असणे आवश्यक आहे.
ही योजना कोणासाठी आहे
* वैयक्तिक शेतकरी
* शेतकऱ्यांचे गट / स्वयंसहाय्यता गट
* महिला शेतकरी गट
* उत्पादक कंपनी / सहकारी संस्था / सहकारी पणन संघ
* नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था
अनुदान व प्रकल्प खर्च
घटक | मापदंड | अर्थसहाय्य दर |
---|---|---|
१ | ५ ते २५ मेट्रिक टन | ₹१०,००० प्रति मे.टन — ५०% म्हणजे ₹५,००० प्रति मे.टन |
२ | २५ ते ५०० मेट्रिक टन | ₹८,००० प्रति मे.टन — ५०% म्हणजे ₹४,००० प्रति मे.टन |
३ | ५०० ते १००० मेट्रिक टन | ₹६,००० प्रति मे.टन — ५०% म्हणजे ₹३,००० प्रति मे.टन |
सर्वसाधारण आणि अनुसूचित क्षेत्रांसाठीही हेच प्रमाण लागू आहे.
प्रकल्प खर्च ३० लाखांपेक्षा अधिक असल्यास बँक कर्ज अनिवार्य आहे.
तांत्रिक निकष काय ?
साठवणूक गृह जमिनीपासून किमान ६० सें.मी. उंचीवर असावे.
चाळीची दिशा दक्षिण-उत्तर ठेवावी; मात्र ज्या भागात पर्जन्यमान अधिक आहे, तिथे दिशा पूर्व-पश्चिम ठेवावी.
आवश्यक कागदपत्रे
जमिनीची मालकी हक्काची कागदपत्रे (७/१२ आणि ८-अ उतारा)
आधार कार्डची प्रत
हमीपत्र (प्रपत्र-२)
बंधपत्र (प्रपत्र-३)
संवर्ग प्रमाणपत्र (अनु.जाती / अनु.जमाती असल्यास)
अर्ज कसा करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 'फलोत्पादन' या विभागाखाली अर्ज करावा.
योजनेची सविस्तर माहिती मिळविण्यासाठी आपल्या नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा टोल-फ्री क्रमांक 1800-2334 000 वर कॉल करावा. तसेच अधिक माहिती www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांसाठी काय फायदे
कांदा आणि लसूण साठवणुकीसाठी टिकाऊ सुविधा
उत्पादनाचे नुकसान कमी होईल
बाजारात योग्य वेळेला विक्री करून अधिक नफा मिळेल
शासनाकडून थेट आर्थिक सहाय्य