बापू सोळुंके
दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या मराठवाड्याला अखेर दिलासा मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व वैतरणा धरणातील ओसंडून जाणारे तब्बल १६.५० टीएमसी पाणी मुकणे धरणामार्फत मराठवाड्याला देण्यासाठी ९८ कोटींच्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. (Jayakwadi Dam Water)
पुढील वर्षीपासून हे पाणी जायकवाडी प्रकल्पाला लाभदायक ठरणार असून, टंचाईग्रस्त मराठवाड्यासाठी ही योजना आशेचा किरण ठरणार आहे.(Jayakwadi Dam Water)
घारगाव (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील उर्ध्व वैतरणा धरणांतील ओव्हरफ्लो १६.५० टीएमसी पाणी मराठवाड्याला देणाऱ्या योजनेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. (Jayakwadi Dam Water)
हे १६.५० टीएमसी पाणी वैतरणा धरणातून मुकणे धरणामार्फत पुढील वर्षी मराठवाड्याला मिळणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.(Jayakwadi Dam Water)
कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील बहुतेक मोठी, मध्यम आणि लघुप्रकल्पांत ३० ते ४० टक्केच जलसाठा आहे. पुढील कालावधीत सतत मुसळधार पाऊस न पडल्यास पाणीटंचाईचा सामना येथील जनतेला करावा लागू शकतो. (Jayakwadi Dam Water)
सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना मराठवाड्यातील नागरिकांना करावा लागतो. जायकवाडीला नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाड्याला पुढील वर्षी सुमारे १६.५० टीएमसी पाणी मुकणेमार्फत गोदावरी नदीतून जायकवाडी प्रकल्पात येणार आहे. जायकवाडी प्रकल्प भरण्यासाठी या पाण्याचा उपयोग होईल. (Jayakwadi Dam Water)
दुसरीकडे मात्र घारगाव येथील 'वैतरणा'तील मराठवाड्यासाठी बांधलेल्या मुकणे धरणात सोडून मराठवाड्याला देण्याची योजना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने सहा वर्षापूर्वी शासनास सादर केली होती.
इगतपुरी तालुक्यातील वैतरणा आणि मुकणे या दोन्ही धरणांत ४० किलोमीटर अंतर आहे. मात्र, पश्चिम वाहिनी वैतरणा नदीवरील घारगाव येथील उर्ध्व वैतरणा प्रकल्प हा मुकणेपेक्षा भौगोलिकदृष्ट्या सुमारे साडेनऊ मीटर उंचीवर आहे. (Jayakwadi Dam Water)
पावसाळ्यात वैतरणा धरण भरल्यानंतर दरवर्षी सुमारे १६.५० टीएमसी पाणी सांडव्याद्वारे वैतरणा नदीत सोडले जाते. हे पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. या सांडव्याशेजारी एक गेट बांधून कॅनॉलद्वारे मुकणे धरणात सोडण्याची आणि मुकणेतून मराठवाड्याला देण्याचा हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता.
सुरुवातीला केवळ १ टीएमसी पाणी देण्याची तरतूद एकात्मिक जलआराखड्यात करण्यात आली होती. हे पाणी वर्षभर मुकणे धरणात सोडण्याची योजना होती. मात्र, वर्षभर पाणी न देता केवळ पावसाळ्यात वैतरणा धरणातील ओसंडून जाणारे १६.५० टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतर कामाला सुरुवात झाली.
वैतरणा प्रकल्पावर गेट बसविणे आणि कॅनॉलचे काम सुरू आहे. या योजनेवर सरकार ९८ कोटी रुपये खर्च करीत असल्याचे जलसंपदा विभागाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील वर्षी वैतरणेचे पाणी मुकणेतून मराठवाड्याला मिळेल.