Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : थेट गोडावूनच्या कांद्यावरच डल्ला, नाशिक जिल्ह्यातील कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Agriculture News : थेट गोडावूनच्या कांद्यावरच डल्ला, नाशिक जिल्ह्यातील कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Latest News Increase in onion theft incidents Nashik district directly on onion of godam | Agriculture News : थेट गोडावूनच्या कांद्यावरच डल्ला, नाशिक जिल्ह्यातील कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Agriculture News : थेट गोडावूनच्या कांद्यावरच डल्ला, नाशिक जिल्ह्यातील कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Agriuclture News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) पिंपळगाव परिसरातील उंबरखेड रोडला कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यावर चोरट्यांनी चोरी केली.

Agriuclture News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) पिंपळगाव परिसरातील उंबरखेड रोडला कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यावर चोरट्यांनी चोरी केली.

नाशिक : कांद्याला चांगला दर (Onion Rate) मिळत असल्याने कांदाचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे व्यापारी व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन कांदा व्यापाऱ्यांनी पिंपळगाव पोलिस ठाण्यात दिले आहे. एकीकडे कांद्याला समाधानकारक भाव मिळत चोरटयांनी कांद्याकडे मोर्चा वळविला आहे. 

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) परिसरातील उंबरखेड रोड गॅस गोडावूननजीक असलेल्या सायलो वाइन बारजवळ हर्षल खाबिया यांचे कांद्याचे गोडावून आहे. मंगळवारी  चोरट्यांनी गोडावूनमध्ये ठेवलेल्या कांद्याच्या ढिगाऱ्यातून जवळपास १४ गोण्या कांदे चोरून नेले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा चोरट्यांनी तार कंपाऊंड तोडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान केले. परिसरातील कुणाल चौधरी यांच्या गुरुदत्त किराणा दुकानाचे शटरदेखील फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरातील व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

सद्यस्थितीत कांद्याचे भाव थोड्याफार प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र हे दर समाधानकारक असल्याचे चित्र आहे. असे असताना चोरटयांनी कांद्याकडे मोर्चा वळवला आहे, थेट गोडाऊनमधून कांदा चोरीचे प्रकार समोर येऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी वर्ग चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामीण पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली जात आहे. 

चोरट्यांची अशीही कामगिरी 

पिंपळगाव परिसरातील उंबरखेड रोडला कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यावर चोरट्यांनी चोरी केली. मात्र, तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आपण कैद तर झालो नाही ना, या भीतीने याच चोरट्यांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी तेथे जाऊन तार कंपाऊंड कट करत ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यााची नासधूस केली आणि डीव्हीआर पळविला. चोरट्यांच्या या कारागिरीची परिसरात जोरदार चर्चा आहे.

Web Title: Latest News Increase in onion theft incidents Nashik district directly on onion of godam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.