Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Talathi Bharti 2026 : तलाठी भरतीबाबत महत्वाची अपडेट, रिक्त पदांची माहिती मागवली, कधीपर्यंत जाहिरात येईल? 

Talathi Bharti 2026 : तलाठी भरतीबाबत महत्वाची अपडेट, रिक्त पदांची माहिती मागवली, कधीपर्यंत जाहिरात येईल? 

Latest news Important update regarding Talathi recruitment, information requested on vacant posts | Talathi Bharti 2026 : तलाठी भरतीबाबत महत्वाची अपडेट, रिक्त पदांची माहिती मागवली, कधीपर्यंत जाहिरात येईल? 

Talathi Bharti 2026 : तलाठी भरतीबाबत महत्वाची अपडेट, रिक्त पदांची माहिती मागवली, कधीपर्यंत जाहिरात येईल? 

Talathi Bharti 2026 : तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Talathi Bharti 2026 : तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Talathi Bharti 2026 : गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. महसूल व वनविभाग मंत्रालय यांच्याकडून एक पत्र राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यामध्ये रिक्त पदांची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच भरतीची जाहिरात जाहीर होण्याची शक्यता आहे. 

राज्यातील पंचायत स्तरावरील तलाठी हे एक महत्वाचे पद म्हणून ओळखले जाते. त्या अनुषंगाने तलाठी भरतीसाठी सरकारकडून पाऊले उचलली जात आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी महसूल व वनविभाग मंत्रालय यांच्याकडून सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांना याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार तलाठी पदभरती बाबत 8 मे पर्यंत माहिती सादर करण्यास सांगितली आहे, त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होईल, असे सांगण्यात आले आहे. 

दरम्यान पत्रात म्हटले आहे की, शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.०२.०४.२०२६ अन्वये महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. सदर सुधारीत आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावयाची आहेत. आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता बिंदू नामावली मागास वर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी. 

त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्राचे स्वतंत्र मागणीपत्र व उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरीता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास दि.०८.०५.२०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावे, त्यानुसार सदर माहिती ०८ तारखेपर्यंत देण्यात आली असून आता लवकरच पद भरतीची निश्चित केली जाणार आहे.

 

'महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतीजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, 2026' लागू, काय आहेत प्रमुख सुधारणा?
 

Web Title : Talathi Bharti 2026: रिक्तियों की जानकारी, विज्ञापन जल्द!

Web Summary : महाराष्ट्र राजस्व विभाग ने 8 मई, 2026 तक जिला-वार तलाठी रिक्तियों का विवरण मांगा। विज्ञापन जल्द ही अपेक्षित। इस भर्ती अभियान का उद्देश्य संशोधित संरचना के बाद ग्राम राजस्व अधिकारियों के रिक्त पदों को भरना है।

Web Title : Talathi Bharti 2026: Vacancy Update, Ad Expected Soon!

Web Summary : Maharashtra's Revenue Department seeks district-wise Talathi vacancy details by May 8th, 2026. Advertisement expected soon. This recruitment drive aims to fill vacant positions of village revenue officers post the revised structure.