HortiNet : परदेशी बाजारपेठेत तुमच्या बागेचे फळ पोहोचवायचंय? तर ‘हॉर्टीनेट’ (HortiNet) प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करा. कृषी व अन्न प्रक्रिया विभागाने फळबाग व भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी २०२५-२६ सालासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. (HortiNet)
राज्यातील फळबाग व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. २०२५-२६ या वर्षासाठी निर्यातक्षम फळबागांची नोंदणी आता 'हॉर्टीनेट ओळख प्रणाली'द्वारे सुरू झाली आहे. (HortiNet)
वाशिम जिल्ह्यातील १४ हजार ४६९ हेक्टर क्षेत्रावरून एकूण १४० बागांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.(HortiNet)
वाशिम जिल्ह्याला यामध्ये १४० बागांचे उद्दिष्ट मिळाले असून, ही शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि बदलाची नांदी आहे.(HortiNet)
निर्यातीसाठी ‘कीटकनाशकमुक्त’ उत्पादनाची मागणी
युरोपियन देशांमध्ये भाजीपाला व फळांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, त्या देशांमध्ये कीटकनाशक मुक्त (Residue-Free) उत्पादनाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भारत सरकारने २००४-०५ पासूनच या मागणीची दखल घेत निर्यातक्षम उत्पादनासाठी 'ट्रेसॅबिलिटी' प्रणाली लागू केली.
प्रारंभी 'ग्रेपनेट' प्रणालीद्वारे द्राक्षबागांची नोंदणी करण्यात आली. या योजनेच्या यशानंतर आता बोर, लिची, अननस, सीताफळ, जांभूळ, पेरू, अंजीर, चिकू, स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफळ आदींसाठीही स्वतंत्र नोंदणी प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नोंदणी कशी करावी?
अर्ज : तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सादर करावेत
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे : सातबारा उतारा, आधार कार्ड, बागेचे फोटो, लागवडीचा तपशील
मार्गदर्शनासाठी संपर्क : तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
फळपिके व भाजीपाला निर्यातीची ताकद
वाशिमसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या शेतकरी पारंपरिक पिकांबरोबर फळबाग, भाजीपाला शेतीकडे वळलेत. यामध्ये प्रामुख्याने खालील पिकांचा समावेश आहे.
फळबाग : द्राक्ष, डाळिंब, आंबा, संत्रा, केळी, पेरू, सीताफळ, अंजीर
भाजीपाला : कांदा, मिरची, कोथिंबीर, ढोबळी मिरची, भेंडी
'हॉर्टीनेट' प्रणाली शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाची?
घटक | फायदा |
---|---|
कीटकनाशक मुक्त शेती | निर्यातीसाठी अनिवार्य |
ऑनलाईन नोंदणी प्रणाली | पारदर्शक आणि सोपी प्रक्रिया |
केंद्र शासन मान्यता | बाजारपेठ मिळवण्यात सुलभता |
सेंद्रिय उत्पादनाला प्रोत्साहन | जागतिक दर्जा |
वाशिम जिल्ह्यातील १४ हजार ४६९ हेक्टर क्षेत्र व १४० बागांचे नोंदणी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावा. अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. - आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम
नोंदणी सुरू : २०२५-२६ सालासाठी
लक्ष्य : १४० बागांची नोंदणी
प्रणाली : हॉर्टीनेट (Hortinet Traceability System)
लाभ : निर्यातीसाठी संधी, जागतिक बाजारपेठ, उच्च उत्पन्न