Gharkul Yojana : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना साधारणतः १.२० लाख ते १.५० लाखांपर्यंतचे अनुदान ४ हप्त्यांत थेट बँक खात्यात मिळते.
घर मंजूर झाल्यावर १५ हजार, पायाभरणी पूर्ण झाल्यावर ७० हजार, छत आणि बांधकाम प्रगतीनुसार उर्वरित हप्ते मिळतात. जर तुमच्या घराचा हफ्ता थकला असल्यास किंवा मिळाला नाही तर काय उपाययोजना कराव्यात, हे पाहुयात....
या गोष्टी तपासून घ्या....
ग्रामपंचायत/नगरपालिका संपर्क : सर्वात आधी आपल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाशी किंवा नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधा. हप्ता का रखडला आहे (उदा. तांत्रिक बिघाड, जिओ टॅगिंग नसणे, किंवा बँक खात्याची माहिती) याची माहिती घ्या.
जिओ टॅगिंग (Geo-tagging) : घरकुलाचे काम कोणत्या टप्प्यावर आहे, याचे जिओ टॅगिंग करणे आवश्यक असते. जर काम थांबले असेल किंवा तांत्रिक कारणामुळे जिओ टॅगिंग झाले नसेल, तर पुढचा हप्ता येत नाही.
बँक खात्याची तपासणी : तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही, हे तपासा. अनेकदा आधार लिंकिंग नसल्यामुळे पैसे जमा होत नाहीत.
ऑनलाइन तक्रार/अर्ज : घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आता पुढील हप्ता मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही 'महाआवास' (MahaAwas) पोर्टल किंवा संबंधित ॲपवरूनही माहिती घेऊ शकता.
पंचायत समिती/गटविकास अधिकारी (BDO) : ग्रामपंचायत स्तरावर समस्या सुटली नाही, तर तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) तक्रार अर्ज दाखल करा.
थोडक्यात : जर तुम्ही घरकुलाच्या कामाचे फोटो अपलोड केले नसल्यास, किंवा तांत्रिक कारणांमुळे हप्ता अडकू शकतो. ग्रामसेवकाकडून 'वर्क प्रोग्रेस'ची खात्री करून घ्या.
