Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : नाशिकच्या मुंगसे बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं? 

Agriculture News : नाशिकच्या मुंगसे बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं? 

Latest News Farmer beaten up in Nashik's Mungse market yard in malegaon tahsil | Agriculture News : नाशिकच्या मुंगसे बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं? 

Agriculture News : नाशिकच्या मुंगसे बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं? 

Nashik News : मुंगसे बाजार समितीत (Mungse Market) एका शेतकऱ्याला मारहाण झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली.

Nashik News : मुंगसे बाजार समितीत (Mungse Market) एका शेतकऱ्याला मारहाण झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली.

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) मालेगाव बाजार समितीत अंतर्गत येत असलेल्या मुंगसे बाजार समितीत (Mungse Market) एका शेतकऱ्याला मारहाण झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. कांद्यात वांधा असल्याच्या कारणावरून व्यापाऱ्यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. या प्रकरणावरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून संबंधित व्यापाऱ्याचे लायसन्स रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

मालेगाव बाजार समितीत (Malegaon Bajar) अंतर्गत येणारी मुंगसे बाजार समितीत मालेगाव परिसरातील असंख्य शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन येत असतात. अशातच चिखलओहोळ येथील शेतकरी दीपक पानसरे हे देखील कांदा विक्रीसाठी घेऊन गेले होते. या ठिकाणी कांद्याचा लिलाव होऊन 1700 रुपयांचा भाव ठरला होता. शेतकरी व्यापाऱ्याकडे कांदा घेऊन (Onion farmer) गेल्यानंतर व्यापाऱ्याने कांदा खराब असल्याचे सांगितले. यावरूनच शाब्दिक वादावादी झाली. यावेळी व्यापाऱ्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचे शेतकऱ्याने सांगितले. 

शेतकरी दीपक पानसरे म्हणाले की, उपस्थित तीन-चार व्यापाऱ्यांनी मिळून मारहाण केली. यावेळी मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत सोडवणूक केली. मात्र मला न्याय हवा असून चूक नसताना व्यापाऱ्यांनी मारहाण केली. एकीकडे शेतकऱ्याच्या जीवावर जगताना त्याच शेतकऱ्याला पायदळी तुडवण्याचा घाट यांनी घातला आहे. आज माझ्या कुटुंबावर ही वेळ आली उद्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या बाबतीत असं घडू शकतं, म्हणून शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असं आवाहन देखील या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांना केलं आहे. 

लायसन्स रद्द करा... 

याप्रकरणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जीवावर बाजार समिती जगत असते. अशातच शेतकऱ्याला मारहाण करणे कितपत योग्य आहे. या प्रकरणाची बाजार समितीने दखल घेऊन तातडीने व्यापाऱ्यांवर कारवाई करून त्याचे सर्वच अधिकार काढून घ्यावेत, शिवाय त्याचे लायसन्स देखील रद्द करावे... अशी मागणी करण्यात आली आहे. 

त्रिसदस्यीय समिती  निर्णय देईल ... 

घडलेली घटना अतिशय निंदनीय असून याबाबत माहिती देऊन वाद मिटवता आला असता, व्यापाऱ्यांची भूमिका घेतली ती चुकीची आहे. यापुढे कोणत्याही व्यापाऱ्याने अशा प्रकारचे कृत्य केल्यास गे केली जाणार नाही. कृषी बाजार समिती प्रशासन माध्यमातून लायसन्स रद्द करण्यात येईल, लिलावात भाग घेता येणार नाही. या प्रकरणी त्रिसदस्यीय समिती स्थापन करून तपास केला जाईल, यावर अहवाल तयार करून सर्व संचालकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल., अशी माहिती मुंगसे बाजार समितीचे उपसभापती चव्हाण यांनी दिली. 

Web Title: Latest News Farmer beaten up in Nashik's Mungse market yard in malegaon tahsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.