Lokmat Agro >शेतशिवार > मोसंबी उत्पादकांनो धीर सोडू नका; घाईत निर्णय घेऊ नका- डॉ. एम. बी. पाटील यांचा सल्ला वाचा सविस्तर

मोसंबी उत्पादकांनो धीर सोडू नका; घाईत निर्णय घेऊ नका- डॉ. एम. बी. पाटील यांचा सल्ला वाचा सविस्तर

latest news Citrus growers, don't lose heart; don't take hasty decisions - Read Dr. M. B. Patil's advice in detail | मोसंबी उत्पादकांनो धीर सोडू नका; घाईत निर्णय घेऊ नका- डॉ. एम. बी. पाटील यांचा सल्ला वाचा सविस्तर

मोसंबी उत्पादकांनो धीर सोडू नका; घाईत निर्णय घेऊ नका- डॉ. एम. बी. पाटील यांचा सल्ला वाचा सविस्तर

Citrus growers : मोसंबीच्या फळबागा पाण्याअभावी होरपळून जात आहेत. यंदा चांगले पाऊस झाले असले तरी वाढत्या तापमानामुळे पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. अनेक शेतकरी आपल्या बागा वाचवण्यासाठी उपाय शोधत आहेत. वाचा सविस्तर (Citrus growers)

Citrus growers : मोसंबीच्या फळबागा पाण्याअभावी होरपळून जात आहेत. यंदा चांगले पाऊस झाले असले तरी वाढत्या तापमानामुळे पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. अनेक शेतकरी आपल्या बागा वाचवण्यासाठी उपाय शोधत आहेत. वाचा सविस्तर (Citrus growers)

शेअर :

Join us
Join usNext

मराठवाडा हे मोसंबीचे माहेर घर म्हणून सर्वदूर नावलौकिक प्राप्त झाले आहे. अशातच जालना आणि पैठण तालुक्यातील प्रसिद्ध व गोड रसाळ मोसंबीला यंदाच्या पाणी टंचाईचा फटका बसला आहेत. (Citrus growers)

फळगळती अन् पाणी संकट असेच राहिल्यास मोसंबीचे क्षेत्र येत्या काळात घटणार असल्याचे भिती निर्माण झाली आहे.  जालना जिल्ह्यामध्ये २९ हजार ९११ हेक्टरवर मोसंबीच्या बागा आहेत. त्यापैकी साडेचार हजार हेक्टर मोसंबीचे क्षेत्र जालना तालुक्यात आहे. (Citrus growers)

एप्रिल महिन्यापासूनच तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने मोसंबीच्या बागांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले असून, अशा दुष्काळी स्थितीत किती शेतकऱ्यांना मोसंबीच्या फळबागा वाचवण्यात यश येईल आणि किती बागा पाण्याअभावी जळून जातील हे येणारा काळच ठरवेल. (Citrus growers)

४५०० हेक्टर क्षेत्रावर असलेल्या मोसंबी बागा पाण्याअभावी होरपळून जात आहेत. अनेक शेतकरी बागा काढून टाकत आहेत, असे चित्र पाहायला मिळते आहे. (Citrus growers)

शेतकऱ्यांनो घाईत निर्णय घेऊ नका, धीर धरा

* मागील वर्षी फळगळीमुळे शेतकरी त्रस्त झाले होते. चालू हंगामात मोसंबी बागेला फळधारणा होण्यास सुरुवात होण्यापूर्वीच बागा तीव्र उन्हाच्या कचाट्यात सापडून वाळून जात आहेत. यामुळे शेतकरी अर्थिक संकटात सापडले

* दोन वर्षापासून शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. अशात शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचे प्राचार्य डॉ. एम. बी. पाटील (Dr. M. B. Patil) यांच्याकडून मोसंबीच्या बागा काढून टाकण्याचा टोकाचा निर्णय घेऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

ठोस उपायोजना हव्यात

* जिल्ह्यामध्ये एक दशकापूर्वी मोसंबी उत्पादकांची चांगली स्थिती होती.

* अलीकडे हवामान बदलाच्या परिणामामुळे मोसंबी उत्पादकांना पदरमोड करूनदेखील पाच - सहा वर्षामध्ये हाताशी फार काही लागलेले नाही.

* प्रयोग करूनही प्रगती साधू इच्छिणाऱ्या तरुण पिढीतील शेतकऱ्यांना सुद्धा हवामान बदल तसेच शेतमालाला मिळणारा भाव यामुळे हा व्यवसाय करताना ठोस धोरणात्मक उपाययोजनांची रास्त अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांनी आहे त्या परिस्थितीमध्ये बागा जगवायच्या असे ठरविले असले तरीही सध्या निर्माण झालेली पाणीटंचाई बघता तालुक्यातील मोसंबीचे क्षेत्र कमी होणार असल्याचे चित्र दिसत आहे. - भगवानराव डोंगरे, अध्यक्ष, जिल्हा मोसंबी उत्पादक संघ

हे ही वाचा सविस्तर : Mosambi and Santri Crops: मोसंबी व संत्रा पिकावरील कोळी किडींवर या करा उपाययोजना

Web Title: latest news Citrus growers, don't lose heart; don't take hasty decisions - Read Dr. M. B. Patil's advice in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.