Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : तंत्रज्ञानामुळे शेती 'स्मार्ट'; तरी शेतमजुरांशिवाय शेती अजूनही अपुरीच!

Agriculture News : तंत्रज्ञानामुळे शेती 'स्मार्ट'; तरी शेतमजुरांशिवाय शेती अजूनही अपुरीच!

latest news Agriculture News: Agriculture is 'smart' due to technology; however, agriculture is still inadequate without farm laborers! | Agriculture News : तंत्रज्ञानामुळे शेती 'स्मार्ट'; तरी शेतमजुरांशिवाय शेती अजूनही अपुरीच!

Agriculture News : तंत्रज्ञानामुळे शेती 'स्मार्ट'; तरी शेतमजुरांशिवाय शेती अजूनही अपुरीच!

Agriculture News : आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीचे चित्र झपाट्याने बदलत असून ट्रॅक्टर, ड्रोन, हार्वेस्टर आणि पॉवर स्प्रे मशीनमुळे शेती अधिक 'स्मार्ट' बनत आहे. मात्र, तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी काही कामांसाठी शेतमजुरांची गरज आजही कायम असल्याचे चित्र आहे.(Agriculture News)

Agriculture News : आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीचे चित्र झपाट्याने बदलत असून ट्रॅक्टर, ड्रोन, हार्वेस्टर आणि पॉवर स्प्रे मशीनमुळे शेती अधिक 'स्मार्ट' बनत आहे. मात्र, तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी काही कामांसाठी शेतमजुरांची गरज आजही कायम असल्याचे चित्र आहे.(Agriculture News)

Agriculture News : काळाच्या ओघात शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत असून आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती अधिक 'स्मार्ट' होताना दिसत आहे.(Agriculture News)

पूर्वी बैलगाडी, नांगर, खुरपे आणि शेतात दिवसभर राबणारे मजूर हेच शेतीचे प्रमुख आधार होते. पेरणी, फवारणी, कापणी, मळणी यांसारखी सर्व कामे मजुरांच्या मेहनतीवरच अवलंबून होती.(Agriculture News)

मात्र आता शेतीत यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने कामांची गती आणि पद्धत दोन्ही बदलल्या आहेत.

आज ग्रामीण भागातील अनेक शेतकरी ट्रॅक्टर, हार्वेस्टर, ड्रोन, पॉवर स्प्रे मशीन तसेच स्वयंचलित पाणीपुरवठा यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. या यंत्रसामग्रीमुळे शेतीची अनेक कामे कमी वेळेत आणि तुलनेने कमी खर्चात पूर्ण होऊ लागली आहेत.

मजुरांची कमतरता; तंत्रज्ञानाकडे वाढता कल

ग्रामीण भागात दिवसेंदिवस शेतमजुरांची कमतरता जाणवत आहे. दुसरीकडे मजुरीचे दरही वाढत असल्याने शेतकरी आधुनिक यंत्रांकडे वळताना दिसत आहेत.

पूर्वी एखादे काम करण्यासाठी दहा ते पंधरा मजूर लागायचे, तेच काम आता मशीनच्या मदतीने काही तासांत पूर्ण होत आहे.

शेतकऱ्यांच्या मते, यंत्रांमुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. पेरणी आणि फवारणीसारखी कामे वेळेत पूर्ण होत असल्याने उत्पादनावरही सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

ड्रोन आणि आधुनिक उपकरणांचा वाढता वापर

अलीकडच्या काळात ड्रोनद्वारे फवारणी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. मोठ्या क्षेत्रावर कमी वेळेत औषध फवारणी करणे शक्य होत असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. तसेच पॉवर स्प्रे मशीन आणि ऑटोमॅटिक सिंचन यंत्रणेमुळे श्रम कमी होत आहेत.

कृषी विभागही शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देत असून विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.

तरीही काही कामांसाठी मानवी श्रम आवश्यकच

तंत्रज्ञानामुळे शेतीची अनेक कामे सुलभ झाली असली तरी काही कामांसाठी अजूनही माणसाची गरज कायम आहे. 

फळभाज्यांची तोडणी, पिकांची निगा राखणे, जनावरांची देखभाल तसेच बारकाईची शेतीकामे अजूनही मानवी श्रमांवरच अवलंबून आहेत.

विशेषतः भाजीपाला, फळबाग आणि दुग्ध व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये मशीन पूर्णपणे पर्याय ठरू शकलेले नाहीत. त्यामुळे शेतमजुरांचे महत्त्व अजूनही कायम असल्याचे चित्र आहे.

शेती वेगवान, पण मातीशी नाते कायम

आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती अधिक वेगवान, कार्यक्षम आणि स्मार्ट झाली असली तरी मानवी मेहनतीचे महत्त्व अजूनही अबाधित आहे. मशीन आणि माणूस यांच्या समन्वयातूनच भविष्यातील शेती अधिक सक्षम होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

मशीन आली तरी माणूस महत्त्वाचाच

मशीनमुळे काही कामे सोपी झाली असली तरी शेतीत माणसाची गरज कधीच संपणार नाही. अनेक कामे अजूनही हातानेच करावी लागतात. त्यामुळे शेतकरी आणि मजूर यांची मातीशी असलेली नाळ कायम राहणार आहे.- सुधाकर गणोरकर, प्रयोगशील शेतकरी, मूर्तिजापूर

पूर्वी पेरणी आणि फवारणीसाठी मजूर मिळवणे कठीण जायचे. आता मशीनमुळे कामे वेळेत पूर्ण होतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढण्यास मदत होत असून आजच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर ही गरज बनली आहे.- दीपक तायडे, तालुका कृषी अधिकारी

हे ही वाचा सविस्तर :Pre-Monsoon Farming Work : अक्षय्य तृतीयेपासून शेतकऱ्यांची धावपळ; मान्सूनपूर्व कामांना वेग

अधिक वाचा : Kharif Season : कमी पावसामुळे पिकांचे नुकसान टाळायचे? कृषी विभागाने सांगितला फॉर्म्युला

Web Title : तकनीक से कृषि 'स्मार्ट,' फिर भी श्रम ज़रूरी।

Web Summary : तकनीक खेती को बदल रही है, इसे ट्रैक्टर, ड्रोन और स्वचालित प्रणालियों से तेज़ और कुशल बना रही है, लेकिन मानवीय श्रम अभी भी महत्वपूर्ण है। कटाई और पशुधन की देखभाल जैसे कार्यों में अभी भी मैनुअल प्रयास की आवश्यकता है, जो आधुनिक कृषि में खेत मजदूरों के स्थायी महत्व को उजागर करता है।

Web Title : Tech makes agriculture 'smart,' but labor remains essential.

Web Summary : While technology transforms farming, making it faster and more efficient with tractors, drones, and automated systems, human labor remains crucial. Tasks like harvesting and livestock care still rely on manual effort, highlighting the enduring importance of farmworkers in modern agriculture.