राज्यातील विविध कृषी अभ्यासक्रमांच्या यंदा तब्बल ८२.५५ टक्के जागा भरल्या असून, १३,८९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
त्यामुळे कृषी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून येते. यंदाही राज्यात यंदा कृषी शाखेच्या विविध १९८ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १६,८२९ जागा होत्या.
राज्यातील महाविद्यालयांमध्ये या जागा उपलब्ध आहेत. यातील १३,८९२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर २,९३७ जागा रिक्त आहेत.
कोणत्या अभ्यासक्रमाला किती प्रवेश?
अभ्यासक्रम | जागा | प्रवेश
बीएस्सी अॅग्रिकल्चर | ११,५०० | १०,१८८
बीएस्सी (हॉर्टिकल्चर) | १,१३४ | ८३८
बीएस्सी (फॉरेस्ट्री) | ७८ | ७४
बीएफएस्सी (फिशरी) | ३८ | ३८
बीटेक (फूड टेक्नॉलॉजी) | १,३५२ | ८६४
बीटेक (बायो टेक्नॉलॉजी) | ९८७ | ६४६
बीटेक (अॅग्रि. इंजिनिअरिंग) | ८४० | ४९८
बीएस्सी कम्युनिटी सायन्स | ५७ | २४
बीएस्सी अॅग्री बिझि. मॅनेजमेंट | ८४३ | ७२२
सर्वाधिक प्रवेश सरकारी कॉलेजांमध्ये झाले असून, ४७ सरकारी कॉलेजांमध्ये ३४८० जागांपैकी ३,३१७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, ९५ टक्के जागा भरल्या आहेत.
तर १५१ खासगीमधील १३,३४९ जागांपैकी १०,५७५ जागा भरल्या आहेत. त्यातून खासगी कॉलेजांमधील ७९ टक्के जागा भरल्या.
अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कांतील नावे कायदेशीररीत्या कमी करायचीत? कशी कराल? वाचा सविस्तर